King Cobra: किंग कोब्राला अंघोळ करताना पाहिलंय का? इंटरेस्टींग व्हिडीओ, नक्की बघा…
जर तो किंग कोब्रा एखाद्या व्यक्तीने घरातच ठेवला असेल तर तो त्याला कसा अंघोळ घालत असेल? वाचतानाच किती दुर्मिळ आहे हे. असाच एक व्हिडीओ आहे जो 3 वर्षांपूर्वी युट्युबवर टाकण्यात आलाय. हा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल झालाय...
प्राण्यांचे अंघोळीचे व्हिडीओ (Bath Video) प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केले जातात. यात सगळ्यात जास्त लोकांच्या आवडीचे व्हिडीओ असतात ते म्हणजे हत्तीचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ! पक्षांचे, कुत्राचे, मांजरीचे अगदी हरणाचेही असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर आहेत जे लोकांना प्रचंड आवडलेले आहेत. आपण चांगल्या, हानिकारक नसणाऱ्या प्राण्यांचे व्हिडीओ खूपच आरामात बघू शकतो. तसे व्हिडीओ सहज उपलब्ध असतात. पण कधी सापाचा अंघोळ करताना व्हिडीओ पाहिलाय का? तो पण साधासुधा साप (Snake) नाही किंग कोब्रा! (King Kobra Bath Video) असे व्हिडीओ फारच दुर्मिळ असतात. वाचूनही प्रश्न पडतो खरंच जगातला सगळ्यात भयानक साप नेमका अंघोळ कसा करत असेल? हे तर काहीच नाही, जर तो किंग कोब्रा एखाद्या व्यक्तीने घरातच ठेवला असेल तर तो त्याला कसा अंघोळ घालत असेल? वाचतानाच किती दुर्मिळ आहे हे. असाच एक व्हिडीओ आहे जो 3 वर्षांपूर्वी युट्युबवर टाकण्यात आलाय. हा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल झालाय…
साप हा सर्वात धोकादायक सरपटणारा प्राणी आहे. सापांच्या विविध प्रजातींपैकी किंग कोब्रा हा सर्वात धोकादायक मानला जातो, तर रॅटलस्नेक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, साप चावल्याने दरवर्षी सुमारे 81 ते 1,38,000 लोक मृत्युमुखी पडतात त्यामुळे बरीच लोकं सापांपासून सुरक्षित अंतर राखतात.
मंडळी हे सांगायचा उद्देश काय, किंग कोब्रा भयानक आहे! तरी हा माणूस त्याच्या घरात या किंग कोब्राला अंघोळ घालतोय. हा व्हिडीओ बघा…
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती किंग कोब्रा आणि रॅटलस्नेक या दोन अत्यंत धोकादायक सापांना आंघोळ घालताना एक धाडसी स्टंट करताना दिसतोय.
चँडलर नावाचा परवानाधारक वन्यजीव सापाच्या पिंजऱ्यातील एक बॉक्स काढून या व्हिडिओची सुरुवात करतो. जेव्हा तो बॉक्सचे झाकण उघडतो, तेव्हा त्याच्या आत एक विशाल किंग कोब्रा गुंडाळलेला दिसतो.
चँडलर चतुराईने आपल्या हातांनी बॉक्समधून सरपटणारा प्राणी उचलून पाण्याने भरलेल्या टबमध्ये ठेवतो. पुढे तो माणूस आपलं लक्ष त्या रॅटलस्नेककडे वळवतो, जो त्याच्या पिंजऱ्याच्या एका कोपऱ्यात रेंगाळताना दिसतो.
एका काठीचा वापर करून चँडलर सावकाशपणे रॅटलस्नेक बाहेर काढतो आणि पाण्याने भरलेल्या दुस-या टबमध्ये ठेवतो.
30 मिनिटांनंतर तो बाथ टबमधून सापांना बाहेर काढतो आणि त्यांना पुन्हा आपल्या पिंजऱ्यात ठेवतो. चँडलरच्या या खतरनाक कामगिरीचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलंय.