एका महान व्यक्तीने टॅटू म्हणून बारकोड गोंदवून घेतलाय! कारण वाचाल तर खूप हसाल
एका माणसाने असा धक्कादायक प्रकार केला, ज्याची अपेक्षाही कुणी करू शकत नाही.
काही लोक त्यांना आवडणाऱ्या गोष्टींकडे अत्यंत आकर्षित होतात. मग ते काहीही असो. तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? हे कदाचित आपल्याला थोडे विचित्र वाटेल, कारण बारकोड प्रत्यक्षात स्कॅन करण्यासाठी आहे. कुणीही आपल्या शरीरावर बारकोड गोंदवून घेणे आश्चर्यकारक आहे. स्मार्टफोनने जगात दबदबा निर्माण केला आहे, कॅश पेमेंट्स आता पूर्णपणे आऊट ऑफ ट्रेंड झाले आहेत. लोक रोख रकमेपेक्षा ऑनलाइन पैसे भरणं पसंत करतात.
बहुतेक लोक कार्ड पेमेंट किंवा गुगल पे फोन पे करतात. बहुतेक व्यवहार हा असाच चालतो. अशा पद्धतीच्या व्यवहाराला सामान्यत: भारतात यूपीआय पेमेंट्स म्हणून ओळखले जाते.
पण एका घटनेने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. तैवानच्या एका माणसाने असा धक्कादायक प्रकार केला, ज्याची अपेक्षाही कुणी करू शकत नाही.
ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी त्याने त्याच्या हातावर एक बारकोड गोंदवला कारण प्रत्येक वेळी आपला फोन काढून स्कॅन करायला त्याला खूप कंटाळा यायचा. पुन्हा पुन्हा पैसे भरण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात म्हणून त्याने शक्कल लढविली आणि बारकोडच गोंदवून घेतला.
नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, तैवानचा एक माणूस कोणत्याही गोष्टीसाठी पैसे देण्यासाठी वारंवार फोन काढयला कंटाळा करायचा, ज्यामुळे त्याला एक विचित्र उपाय सापडला.
त्याने त्याच्या हातावर आपला पेमेंट बारकोड गोंदवून घेतला आणि आता जेव्हा जेव्हा कोणाला पैसे द्यावे लागतात, तेव्हा तो फक्त आपला हात दाखवतो.
या व्यक्तीची ओळख उघड झाली नव्हती, मात्र आता तो तैवानमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्याची ही कहाणी देशाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘डीकार्ड’वर व्हायरल झाली आहे.
या व्यक्तीने सांगितलं की, तो बऱ्याच दिवसांपासून टॅटू काढण्याचा विचार करत होता. तेव्हाच त्याने या अनोख्या कल्पनेचा विचार केला.