नागीण डान्स काय घेऊन बसलात, हे आहेत 2022 चे मुर्गा डान्स! तुम्हाला कोणता आवडला?
या लोकांचा डान्स पाहिला तर तुम्हालाही खूप हसू येईल. जनतेला हे व्हिडिओ खूप आवडलेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर आणखी हसाल.
नृत्य करायची एक वेगळी मजा असते. लग्न असो वा पार्टी, गाणं वाजतं तेव्हा लोक नाचू लागतात लोक स्वतःला रोखू शकत नाहीत अशी ही गाणी असतात. बरेचदा मग असेच लग्नातले व्हिडीओ व्हायरल होतात. आपल्याकडे नागीण डान्स फेमस आहे तसा बाहेरील राज्यात लोक मुर्ग डान्स करतात. नुकताच एका महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, यात या महिलेने केलेल्या ‘मुर्गा डान्स’ने जनतेला खळखळून हसवलं. अशातच आता अशाच प्रकारे ‘मुर्गा डान्स’ करणाऱ्या एका मुलाची डान्स क्लिपही इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. हा व्हिडीओ इतका भन्नाट आहे. 2022 मध्ये या मुर्गा डान्सचे 2 व्हिडीओ व्हायरल झालेत. आता तुम्ही सांगा तुम्हाला यातला कोणता व्हिडीओ जास्त आवडलाय.
या दोन लोकांचा डान्स पाहिला तर तुम्हालाही खूप हसू येईल. जनतेला हे व्हिडिओ खूप आवडलेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर आणखी हसाल.
या मुलाच्या या खतरनाक डान्सला आतापर्यंत 57 लाख व्ह्यूज आणि 2 लाख 40 लाईक्स मिळाले आहेत. तर 1500 हून अधिक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
एका व्यक्तीने लिहिले की, “भाऊ, कोंबडीचा अपमान करू नकोस”, दुसऱ्याने लिहिले की, “कोंबडीची मानवी प्रजाती” तिसऱ्याने लिहिले की, भाऊ नाचत आहे कि घाबरवत आहे.”
हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम युजर maheshdewatwal01 ने 14 नोव्हेंबर रोजी शेअर केला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. ती क्लिप शेअर करताना त्या व्यक्तीने लिहिले- चिकन डान्स, चिकन डान्स.
हा दुसरा व्हिडीओ आहे महिलेचा, यात तिनेही मुर्गा डान्सच केलाय. ही क्लिप एका लग्नसोहळ्याची असून, त्यात महिला आणि मुलं ‘मुर्गा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
अचानक एक मावशी या गाण्यावर अशी खतरनाक ठेका धरू लागते. आसपासची मुलं-मोठी माणसं हसू लागतात. होय, त्यांच्या डान्स स्टेप्स एकदम कोंबडी सारख्या आहेत. शिवाय हा व्हायरल डान्सचा व्हिडिओ तुम्ही स्वतः पाहिल्यावर तुम्हाला जास्त मजा येईल.