Viral: “एकदम से वक्त, हालात, जज्बात सब बदल गए!” दारूच्या नशेत पैज लावली, उतरली तेव्हा…
पण रेसकोर्सवरील घोषणेत विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. विजेता म्हणून जॅरॉडच्या नावाच्या घोषणा झाली आणि हे ऐकून जॅरॉडला आश्चर्याचा धक्का बसला! शुक्रवारी जॅरॉड यांनी याबाबत मुलाखत दिली, जी आता चर्चेत आली आहे.
दारूच्या (Alcohol) नशेत कधी कुणाचं नशीब चमकलं आहे असं कधी ऐकलंय का? आपल्याकडे तरी दारू मुळातच बदनाम आहे. पण एक अशी घटना घडली ज्यात एका माणसाचं नशीब फळफळलं! नशेत त्याने पैज लावली आणि तो जेव्हा शुद्धीत आला तेव्हा त्याच्याकडे पैजेत लावलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे होते. तो स्वतः इतका शॉक झाला कि नशीब असं अचानक बदलू शकतं यावर त्याचा विश्वास (Trust) बसेना! त्याने एका वृत्तपत्राला यासंदर्भात मुलाखत (Interview) दिली तो प्रचंड फेमस झाला.
नशीब कधी चमकेल हे कधीच कुणी सांगू शकत नाही. असाच काहीसा प्रकार दारूच्या नशेत एका शर्यतीत घोड्यावर पैज लावणाऱ्या माणसाच्या बाबतीत घडला. ज्या घोड्यावर त्याने पैज लावली होती, तो घोडा शर्यत जिंकण्याची कोणतीही शक्यता नव्हती. पण शेवटी एक ‘चमत्कार’ घडला आणि तो माणूस करोडपती झाला. या विजयानंतर त्याची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, ही घटना ऑस्ट्रेलियातील आहे. जेथे जॅरॉड नावाच्या व्यक्तीने घोड्यावर 11 हजार रुपये सट्टा लावून सुमारे 20 लाख रुपये (20,000 पौंड) जिंकले. विशेष म्हणजे जॅरॉडने ही पैज दारूच्या नशेत लावली होती.
इतकेच नव्हे, तर त्या घोड्याने शर्यत जिंकण्याची शक्यता नगण्य होती, कारण तो शर्यतीत 180-1 असा पिछाडीवर होता. पैज लावल्यानंतर जॅरॉडला आपण बक्षीस जिंकू शकू याची कल्पनाही नव्हती. पण रेसकोर्सवरील घोषणेत विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. विजेता म्हणून जॅरॉडच्या नावाच्या घोषणा झाली आणि हे ऐकून जॅरॉडला आश्चर्याचा धक्का बसला! शुक्रवारी जॅरॉड यांनी याबाबत मुलाखत दिली, जी आता चर्चेत आली आहे.
Hilarious ‘interview of the year’ sees punter win £20,700 after putting all his money on horse he bought when drunk https://t.co/H6yKMIcn6u
— Irish Sun Sport (@IrishSunSport) June 10, 2022
Racing.Com यांना दिलेल्या मुलाखतीत जॅरॉड म्हणाला की, “त्या दिवशी माझ्याकडे फक्त 14-15 हजार रुपये होते. मी मित्रांसोबत बिअर पीत होतो. इतक्यात आम्ही रेसकोर्सच्या तबेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फेरफटका मारला. तिथे आम्ही मजे मजेत घोड्यावर पैज लावले. पैसे कमी पडले मग आम्ही प्रत्येकाने थोडे थोडे एकत्र केले आणि त्या पैजेत लावले. अखेर कळलं की, आपल्या घोड्याला 20,000 पौंडांपेक्षा जास्त बक्षिस मिळालंय. मुलाखतीत जॅरॉड म्हणाले की, हे सर्व माझ्या आई आणि वडिलांसाठी आहे.
जॅरॉड यांच्या मुलाखतीच्या व्हिडिओवर सर्व युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने म्हटले की, नशीब असावं तर असं, दुसऱ्या युझरने सांगितले की अभिनंदन, तुम्ही श्रीमंत झालात. आणखी एका युझरने लिहिले- नशीब बदलायला वेळ लागत नाही.