‘काळं पाणी’ सेलिब्रिटीना का आवडतं, सामान्य पाण्यापेक्षा काय विशेष? जाणून घ्या
काळे पाणी किंवा काळे अल्कधर्मी पाणी जे आरोग्यासाठी देखील अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामुळे शरीर डिटॉक्स होते. चयापचय शक्ती वाढते. प्रत्येकाने हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की या गोष्टींपेक्षा नैसर्गिक पर्याय नेहमीच अधिक फायदेशीर आणि प्रभावी असतात.
आपल्या निरोगी आरोग्यासाठी तसेच शरीर हायड्रेड राहण्यासाठी पाणी नियमित पिणे महत्वाचे असते. तसेच आपण नेहमीच ऐकतो कि पाणी भरपूर प्रमाणात प्यायल्याने आरोग्य सुधारते. अनेक समस्यांपासून सुटका होते. पण तुम्ही कधी काळ्या पाण्याबद्दल ऐकलं आहे का? कारण काही सेलेब्रिटी हे काळे पाणी पिताना दिसतात. यात मलायका अरोरा, विराट कोहली, श्रुती हसन, गौरी खान, टायगर श्रॉफ आदींचा या यादीत समावेश आहे, शेवटी हे काळे पाणी काय आहे आणि सेलिब्रिटींना ते पिणे का आवडते, त्यात ते कसे आहे? चला जाणून घेऊया काळ्या पाण्याचे फायदे.
काळं पाणी (ब्लॅक वॉटर) म्हणजे काय?
हे पाणी दिसायलाही काळ्या रंगाचे असते. परंतु यात असे काय आहे की हे फार लोकप्रिय आहे. हे पाणी फिटनेस फ्रिक लोकांसाठी तर अगदीच बेस्ट आहे. हे अल्कलाईन असते. यात भरपुर प्रमाणात न्युट्रिएटंस असतात. ब्लॅक वॉटरमध्ये फुल्विक अॅसिड मिसळले जाते. हे नैसर्गिकरीत्या तयार होणारे सेंद्रिय संयुग माती, वनस्पती आणि पाण्यात आढळते. यात आवश्यक अशी खनिजे म्हणजे मिनिरल्स, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते.
काळं पाणी पिण्याचे फायदे
अल्कधर्मी किंवा काळे पाणी महाग असले तरी सेलिब्रेटींना फिट आणि निरोगी राहण्यासाठी ते पिणे विशेष आवडते. बहुधा महाग असल्याने आजही ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शतायु आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र चालवणारे डॉ. अमित कुमार सांगतात की, काळ्या पाण्यात असलेले गुणधर्म शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात.
– काळ्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया वेगवान होते.
– पचनशक्ती मजबूत होते यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही. पोटात चांगल्या जीवाणूंची वाढ होते.
– या पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हे पाणी प्यायल्याने अनेक इन्फेक्शन, आजार टाळता येतात. हे शरीराला डिटॉक्सिफाई देखील करते.
– काळ्या पाण्याच्या तुलनेत सामान्य पाण्यातील काही खनिजे तुलनेने कमी आहेत.
– ही मिनरल्स शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. आरओच्या पाण्यात पीएच पातळी कमी असून उच्च आम्लीय स्वरूप असते. यामुळे कधीकधी शरीराला आरओ पाण्याची समस्या उद्भवू शकते.
– काही लोकांना व्हिटॅमिन आणि सप्लीमेंट्स अतिरिक्त घ्यावे लागतात. याकरिता ही कमतरता भरून काढण्यासाठी काळे पाणी काही प्रमाणात मदत करू शकते.
– ज्यांना पोटात ॲसिडिटीची समस्या आहे त्यांच्यासाठी अल्कधर्मी पाणी प्रामुख्याने फायदेशीर ठरू शकते. यामुळे तयार होणाऱ्या पेप्सिन एंजाइमची क्रिया कमी करण्यासाठी क्षारीय मिनरल वॉटर फायदेशीर ठरू शकते.