VIDEO: रुग्णालयात नर्सचा अफलातून डान्स, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video | हा व्हीडिओ युटा रुग्णालय विश्वविद्यालयातील आहे. यामध्ये रुग्णालयातील एक महिला कर्मचारी अफलातून नृत्य करताना दिसत आहे. या महिलेच्या कौशल्यपूर्ण आणि नजाकतपूर्ण नृत्याची सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वाहवा होताना दिसत आहे. निळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या या महिला कर्मचाऱ्याची बॅले डान्सची एक-एक स्टेप पाहण्यासारखी आहे.

VIDEO: रुग्णालयात नर्सचा अफलातून डान्स, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 10:48 AM

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक भावनिक, मजेशीर किंवा चीड आणणारे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हीडिओ अवघड किंवा तणावाच्या परिस्थितीमध्येही लोकांमध्ये जगण्याची किती उर्मी आणि उत्साह आहे, याचा प्रत्यय आणून देणारे असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Health worker dance in hospital goes viral on Social Media)

नेमकं काय आहे व्हीडिओमध्ये?

हा व्हीडिओ युटा रुग्णालय विश्वविद्यालयातील आहे. यामध्ये रुग्णालयातील एक महिला कर्मचारी अफलातून नृत्य करताना दिसत आहे. या महिलेच्या कौशल्यपूर्ण आणि नजाकतपूर्ण नृत्याची सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वाहवा होताना दिसत आहे. निळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या या महिला कर्मचाऱ्याची बॅले डान्सची एक-एक स्टेप पाहण्यासारखी आहे. हे नृत्य सुरु असताना रुग्णालयाच्या लॉबीत एक व्यक्ती पिआनो वाजवत आहे. पियानोच्या सुरावटींवर महिलेचे सुरु असलेले नृत्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ही महिला नेमकी कोण आहे, याबद्दल विचारणा केली. मात्र, या महिला कर्मचाऱ्याने तोंडावर मास्क घातल्यामुळे तिची नेमकी ओळख पटू शकलेली नाही.

व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. University of Utah Health @UofUHealth या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

संबंधित बातम्या:

Video: दिलजीत दोसांझच्या गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

Video | भर रस्त्यात राग अनावर, म्हाताऱ्या आजोबांचा तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

VIDEO: अमेरिकन डान्सर पत्नीसोबत बॉलीवूडच्या ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर थिरकतो तेव्हा….

(Health worker dance in hospital goes viral on Social Media)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.