Heartbreaking: आईगं! लसणाला योग्य भाव न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने…
योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
शेतकऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सीमेवर लढणारे सैनिक आणि अन्नदाता शेतकरी यांना भारतात फार महत्त्व आहे. मध्य प्रदेशच्या अगदी टोकाला असलेल्या नीमच जिल्ह्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शेतकरी लसणाने भरलेली पोती वाहत्या नाल्यात टाकतोय. खरं तर नीमच मंदसौर जिल्ह्यात लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, मात्र नीमच जिल्ह्यातील चोखनखेडा या गावातील शेतकरी योग्य भाव न मिळाल्याने संतप्त झालेत. आता इथलाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एका संतप्त शेतकऱ्याने आपल्या लसणाच्या अनेक पोती वाहत्या नाल्यात फेकल्यात. योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
शेतकरी दिनेश अहिर यांनी एकूण 40 लसणाची पोती नाल्यात टाकली. या व्हिडिओत दिसून येतंय शेतकरी पोत्यातील लसूण नाल्यात टाकत आहे, तर समोर उभी असलेली व्यक्ती त्याचा व्हिडिओ बनवत आहे.
व्हिडिओमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं कारण काय आहे, हेही सांगितलं. त्याचबरोबर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या शेतकऱ्याने सांगितले की, लसणाची लागवडीच्या वेळी केलेला खर्च सुद्धा त्यांना मिळू शकत नाही. लसणाची विक्री करण्यासाठी लसूण बाजारात नेण्यासाठी जी मालवाहतूक केली जाते ती सुद्धा महाग होत चाललीये अशी परिस्थिती आहे.
या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने संतप्त शेतकऱ्याने आपला सगळा लसूण जवळच्या नाल्यात फेकून दिला.
सरकार शेतकर् यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबद्दल बोलत आहे. याउलट परिस्थिती उलट आहे. शेतकऱ्यांना अजूनही शेतीत चांगले उत्पन्न नाही.
हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. अन्नदात्यावर अशी वेळ येऊ शकते हे बघून लोकांनाही वाईट वाटतंय.