Mumbai Rains Viral: धो धो बरसा पानी, पानी ने वाट लगायी! मुंबईत पाऊस मुसळधार, सोशल मीडियावर मिम्स कोसळधार
Mumbai Rain: आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे सोशल मीडियावरून जितकं आपल्याला कळू शकतं ते दुसरं कुठूनच नाही. चला मग बघुयात मुंबईच्या पावसाचे व्हायरल!
मुंबईः मुंबईचा पाऊस म्हणजे कहर! मुंबईत पाऊस (Mumbai Rains) सुरु झाला की इथे आपोआप दोन गट पडतात. एक जो पावसाच्या प्रेमात पडून कविता लिहीतो आणि दुसरा ज्या गटाला पाऊस अजिबात आवडत नाही. पाऊस आपल्याला किती गरजेचा आहे हे काय सांगणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. पण तरीही एका पॉईंटला आलं की हा पाऊस नको नकोसा होतो. मुंबईसह उपनगरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत असल्याने परिसरातील अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दहीसर, कांदिवली, मालाड, गोरेगांव आणि अंधेरी येथील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्याचा फटका परिसरातील अनेक नागरिकांना बसला आहे. जेव्हापासून पाऊस सुरु झालाय लोकं सुद्धा जाम सक्रीय झालेत सोशल मीडियावर. कुणी मिम्स शेअर (Memes On Mumbai Rains) करून मुंबईतल्या पावसाचं मजेशीर वर्णन करतंय तर कुणी फोटोज पोस्ट करून सत्य समोर ठेवतंय. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे सोशल मीडियावरून जितकं आपल्याला कळू शकतं ते दुसरं कुठूनच नाही. चला मग बघुयात मुंबईच्या पावसाचे व्हायरल!
1) मुंबईकर! मुंबईकरांचा महापालिकेवरचा विश्वास आणि त्यांचा विश्वासघात
मुंबईकर कसा मुंबई महापालिकेच्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि पावसाचा सामना करायला सज्ज होतात आणि कसा त्यांचा नेहमीच पचका होतो याचं उत्तम पद्धतीनं वर्णन करणारं मिम!
Mumbaikar anixously waiting for monsoon to arrive.
Mumbaikar after few hour of incessant rain.
Thanks BMC for their impeccable and impressive works of flooding mumbai in record time as always.#MumbaiRains #MumbaiRains pic.twitter.com/uTl6yUyppN
— Patrik (@Patrik26505229) June 30, 2022
2) करोडो रुपये खर्च करूनसुद्धा मुंबई अजून तशीच!
टॅक्स भरणाऱ्या एका त्रयस्ताने आवाज उठवलाय! अमिताभ बच्चनच्या पोस्टर वरून त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्यात.
Dear @mybmc I’m a tax payer mumbaikar. Every yr u guys are claiming that monsoon situation is under ctrl. After spending crores of rupees still its the same. Plz see potholes in andheri east n other parts of mumbai. BTW BMC is d richest civic body in the country.#mumbairains pic.twitter.com/WLVmnX0Osk
— Vijay Thadeshwar (@VThadeshwar14) July 5, 2022
3) तुमच्या परिसरात पाणी साठलं तर हा उपाय करा!
Must buy in Mumbai Rain ! #MumbaiRains #Monsoon2022 #Mumbai pic.twitter.com/UszLXBo35b
— Youth of India ?? हिंदुस्तान के युवा (@HindustanKeYuva) July 1, 2022
4) लांब उडीची प्रॅक्टिस केलीये का?
Prepare for Mumbai Rains #MumbaiRains #Mumbai pic.twitter.com/dK99khgWbq
— Abhay Shah (@shahabhay145) June 29, 2022
5) भर पावसात पोलीस आपलं कर्तव्य बजावताना!
Mumbai police avenging the city from these heavy rains, true warriors! ?#mumbaipolice #MumbaiRains #salute pic.twitter.com/H0PKCJ21Lz
— Mir Qurram Ali (@Qurramalitrs) July 4, 2022
(ही बातमी केवळ मनोरंजनासाठी आहे. कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही.)