गल्लीतल्या काकू सारखंच लग्न कधी करणार विचारतात का? हा उपाय करा
मावशी सुद्धा थांबत नाहीत, हा प्रश्न त्या एकदा-दोनदा नव्हे तर वेळोवेळी विचारत राहतात. या सवयींनी त्रस्त झालेले काही लोक असे काही तरी बोलतात ज्यामुळे त्यांना वाईट वाटते. लग्नासाठी महिलांचा एकप्रकारचा दबाव असतो मग भलेही त्या आपल्या नातेवाईक असोत किंवा नसोत.
तुमच्या अनेकदा लक्षात आलं असेल की आपल्या परिसरातील मावशी अनेकदा आजूबाजूच्या तरुण मुला-मुलींना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारतात. बहुतेक लोक ते हसून टाळतात, परंतु मावशी आपल्याला चिडवत असतात हे अनेकांना समजून येत नाही. मावशी सुद्धा थांबत नाहीत, हा प्रश्न त्या एकदा-दोनदा नव्हे तर वेळोवेळी विचारत राहतात. या सवयींनी त्रस्त झालेले काही लोक असे काही तरी बोलतात ज्यामुळे त्यांना वाईट वाटते. लग्नासाठी महिलांचा एकप्रकारचा दबाव असतो मग भलेही त्या आपल्या नातेवाईक असोत किंवा नसोत. गॉसिप करणाऱ्या मावशी तरुण मुलींना लग्न करायला हवं याची आठवण करून द्यायला कधीच चुकत नाहीत. काय करायचं मग अशा मावशींचं?
लग्नाच्या प्रश्नाने तुम्हीही वारंवार त्रस्त आहात का?
कौटुंबिक समारंभ असो किंवा अचानक झालेली भेट असो, मावशी “लग्न कधी करणार आहेस?”, असा प्रश्न नक्कीच विचारते. आता तर हे खूप सर्रास झालंय. मग तुम्ही अशा लोकांपैकी आहात का जे वारंवार प्रश्न टाळून कंटाळले आहेत? सध्या एका ट्विटर युजरने या समस्येवर एक उपाय शोधून काढला आहे आणि तो कदाचित तुम्हाला थक्क करेल. एका अशाच त्रस्त व्यक्तीने अशा गॉसिप करणाऱ्या मावशींना घरी बोलावलं आणि एक कप चहाने मावशींचा चहा खराब केला असं समजा. जवळजवळ बहुतेक भारतीय घरांमध्ये गरमागरम चहा दररोज प्यायला जातो. वापरकर्त्याने त्या सर्व गुंड नातेवाईकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
Serve it to all the aunties who come to your place and ask you to get married! pic.twitter.com/HnnT3OcYUW
— bhaavna arora (@BhaavnaArora) March 20, 2023
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ट्विटर युजर चहा बनवत आहे, पण त्यात असं काहीतरी टाकलं जातंय जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गरमागरम चहा बनवताना त्यात वेलची, दालचिनी, आले, लवंग नव्हे तर तिखट लाल मिरचीचा वापर केला जात आहे. या क्लिपमध्ये मसालेदार चहा बनवण्यासाठी एक मोठं भांडं मिरचीने भरलं जातं. चांगले उकळल्यानंतर चहा पोर्सेलिनच्या कपमध्ये सर्व्ह केला जातोय. ज्या ट्विटर युजरने ही क्लिप शेअर केली आहे, त्याने गंमतीने तुमच्याकडे येणाऱ्या सर्व मावशींना हा असा चहा सर्व्ह करण्याचा सल्ला दिलाय. तुम्हाला वारंवार लग्न करायला सांगणाऱ्या मावशींसाठी हा चांगला उपाय आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.