ओहो…आहा! क्या स्टाईल है, सांगा बरं हा डान्स करताना नेमकी कशाची नक्कल करतोय?
हा मुलगा डान्स करत असताना तुम्हाला ओळखायचंय की हा नेमका कशाची नक्कल करतोय. नीट बघितलं तर सोप्पंय कळतंय सुद्धा.
नृत्यप्रकारांचे अनेक प्रकार आहेत. पण कोणताही प्रकार देसी डान्सशी स्पर्धा करू शकत नाही. लग्नाला आलेल्या या मुलानेही आपल्या डान्सने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसे तर तुम्ही वरातींना अनेकदा विचित्र डान्स करताना पाहिलं असेल. पण हा व्हिडिओ वेगळा आहे. हा मुलगा डान्स करत असताना तुम्हाला ओळखायचंय की हा नेमका कशाची नक्कल करतोय. नीट बघितलं तर सोप्पंय कळतंय सुद्धा.
या व्हिडीओमध्ये एक मुलगा मिरवणुकीत ढोलताशांच्या गजरात नाचताना दिसतोय. डान्समधली खास गोष्ट म्हणजे मुलगा हावभावात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय.
व्हिडिओ पाहून तुम्हालाही मुलाच्या मनातील इच्छा जाणून घेता येईल. सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हायरल व्हिडिओ तुम्हीही पाहा…
भावनाओ को व्यक्त करने के लिए लफ्जों की जरूरत नहीं होती … a simple step by step work flow ? pic.twitter.com/loQ58VX2U3
— 24 (@Chilled_Yogi) November 5, 2022
या व्हिडीओमध्ये हा मुलगा ग्लास उचलण्यापासून ते डान्समध्ये पाणी घालण्यापर्यंत अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मुलाचे हावभाव नाचताना पाहून अनेकांना आपलं हसू आवरता येत नाही.
नृत्याच्या माध्यमातून त्यांनी दारू पिण्याच्या सर्व स्टेप्स सांगितल्या. पण दारू पिणं हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे लक्षात ठेवा.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ३८ सेकंदांचा हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे.
इतकंच नाही तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसतायत.