Eknath Shinde: ‘क्यूँ हिला डाला ना?’, फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकवर भन्नाट Memes एकदा पहाच!
आज संध्याकाळी एकनाथ शिंदेंचा शपथविधी होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सत्तेचा खेळ अखेर आज एका नव्या वळणावर येऊन पोहोचला.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रीपदी असतील अशी घोषणा करत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मास्टरस्ट्रोक खेळला. आज संध्याकाळी एकनाथ शिंदेंचा शपथविधी होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सत्तेचा खेळ अखेर आज एका नव्या वळणावर येऊन पोहोचला. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (Maharashtra CM) असतील अशी घोषणा केली. त्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. ट्विटरवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरून भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.
पहा मीम्स-
What a masterstroke by @BJP4India #एकनाथ_शिंदे @Dev_Fadnavis proven best man again Eknath Shinde is the New CM of Maharashtra pic.twitter.com/xwY2HDqBsN
हे सुद्धा वाचा— Anurag Maurya?? (@ImAnuragMaurya_) June 30, 2022
After Devendra Fadnavis announced Eknath Shinde as the next CM of Maharashtra.
Each #Shivsena worker to #DevendraFadnavis ??#MaharashtraPolitics एकनाथ शिंदे #Masterstroke pic.twitter.com/bEUwsHUbAE
— Rakesh Arora (@Rakesh14_Arora) June 30, 2022
Masterstroke by BJP | Burnol Moment for Naysayers #EknathShinde to be next CM of Maharashtra ? pic.twitter.com/tCVrpt1Z7B
— PoliticsSolitics (@IamPolSol) June 30, 2022
I think its all cause of Mota Bhai….? What a player !!! #masterstroke #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena pic.twitter.com/8JGN5aNaEB
— OmkarTheMentor (@Mentorspeaks) June 30, 2022
“आम्ही राज्याला विकासाच्या दिशेने नेऊ. देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे आहेत. या प्रवासात ते आमच्यासोबत आहेत. त्यांचं मार्गदर्शन राहील. त्यांनी उदारता दाखवली. ही उदारता दुर्मिळ आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत दिली. “राज्यात एक मजबूत सरकार येईल. मोदी, शहा आणि नड्डाजींचं पाठबळ मिळेल. ज्या राज्याबरोबर केंद्राची ताकद उभी राहते तिथे विकासात कोणताही अडथळा येणार नाही. हे सरकार विकासासाठी कटीबद्ध आहे. लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात कटीबद्ध आहे,” असंही ते म्हणाले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“मी नगरविकास मंत्री होतो. माझ्या अडचणी सुटत होत्या. पण बाकी आमदारांना समस्या सोडवत्या येत नव्हत्या. म्हणून हा निर्णय घेतला. राज्याच्या हिताचा निर्णय घेतला. 120 चा आकडा भाजपकडे आहे. असं असतानाही मुख्यमंत्रीपद भाजपही घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मनाचा मोठेपणा दाखवला. मोदी, शहा, फडणवीसांचे आभार मानतो. ही ऐतिहासिक घटना आहे. कुणाला मंत्रिपद पाहिजे असं नाही. मी कुठलीही अपेक्षा केली नव्हती. पण जे काही घडलं ते वास्तव आपल्यासमोर आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.