ओव्हरटेकचा एक प्रयत्न आणि खोल दरीत पडता पडता वाचला, हिमालयातील रस्त्यांवरचा थरार पाहा!

व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जाणाऱ्या मालाने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अचानक दुचाकीस्वाराला असे काही घडते, ज्यामुळे त्याचा तोल बिघडतो आणि दुचाकीसह लोक दरीच्या दिशेने घसरतो.

ओव्हरटेकचा एक प्रयत्न आणि खोल दरीत पडता पडता वाचला, हिमालयातील रस्त्यांवरचा थरार पाहा!
बाईक घसरली अन् रायडर दरीत पडता पडता वाचला
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 6:00 PM

कितीही रस्ते अपघात झाले तरी चालक रस्त्यावर मस्ती करण्याचं थांबत नाहीत. बऱ्याचदा अपघात होतात, पण त्यात कुणाला काही होत नाही. पण आपल्याकडे असेही काही भाग आहे, जिथल्या रस्त्यांवर तुमची गाडी थोडीजरी हलली तर मृत्यू निश्चित आहे. अहो इथं गाडीला ओ्हरटेक करणंही मृत्यूचा दाढेत जाण्याचं कारण ठरु शकतं. आम्ही बोलत आहोत, हिमालयातील रस्त्यांबद्दल. त्यामुळे अशा रस्त्यांवरच मस्ती करणं भल्याभल्यांच्याही अंगाशी येऊ शकतं. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एक दुचाकीस्वाराने जरा ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, आणि हे काम त्याच्या जीवावर बेतता बेतता राहिलं. ( Himalaya adventure roads Viral video of bike rider who overtake truck on narrow road and he slips)

व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जाणाऱ्या मालाने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अचानक दुचाकीस्वाराला असे काही घडते, ज्यामुळे त्याचा तोल बिघडतो आणि दुचाकीसह लोक दरीच्या दिशेने घसरतो. या घटनेत तो थोडक्यात बचावला, कारण त्याची बाईक आणखी थोडी घसरली तर तो खोल दरीत कोसळला असता, त्यानंतर त्याचा जीव वाचवणे अशक्य होते.

व्हायरल व्हिडीओ:

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन दुचाकीस्वार एका निसरड्या रस्त्यावरून मोटारसायकलवरून सामान घेऊन जाताना दिसत आहेत आणि दोन ट्रक त्यांच्या समोरून जाताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पाऊस आणि बर्फामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे, तरीही एक दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर त्याची दुचाकी घसरायला लागते आणि अशा परिस्थितीत त्याचं नशीब त्याला साथ देतं आणि ती मागचा दुचाकीस्वारही त्याच्या मदतीला येतो. त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचतो.

हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल हॉग नावाच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. जो वृत्त लिहिपर्यंत 18 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना ‘फायनल डेस्टिनेशन’ चित्रपटाची आठवण झाली, तर अनेक युजर्सनी कमेंट करून अशा वाटांवर चालताना खबरदारी घ्यायला हवी असे सांगितले. कारण एक छोटीशी चूक तुमचा जीव घेऊ शकते!

हेही पाहा:

Video: मजा मस्ती करणारं चिंपांझींचं सुखी कुटुंब, व्हिडीओला नेटकऱ्यांकडून भरभरुन प्रतिसाद

Video: पोरगं घ्या, पोरगं…50 हजाराला पोरगं… या बापावर मुलांना विकण्याची वेळ का आली?

शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.