बाबा वेंगा, नास्त्रेदमस नव्हे, या भविष्यवेत्त्याने सांगितल्या भारताबाबतच्या चार भविष्यवाण्या; हिंदुत्वाशी कनेक्शन काय?
Biggest Prediction about Hinduism : आपल्यातील एका पिढीने नास्त्रेदमसच्या अनेक भविष्यवाण्या वाचल्या आहेत. तर इंटरनेट युगातील पिढीला बाबा वेंगाची भाकीतं माहिती आहेत. पण या भविष्यवेत्त्याचे भारताविषयीचे भाकीत अनेकांना माहितीच नाहीत, कोण आहे ही व्यक्ती?

जगातील अनेक लोक त्यांना भविष्यातील घडामोडींचा अंदाज असल्याचा आपण दावा करतो. काहीतर आपल्या आजूबाजूला पण असतात. तर काही होऊन गेले आहेत. त्यांच्या अतींद्रिय शक्तीचा पसारा इतका मोठा असतो की विज्ञानाच्या भाषेत ती गोष्ट निरर्थक असते. पण काही भविष्यवाणी जेव्हा खऱ्या ठरल्या तेव्हा अनेक जण या गूढ शास्त्राकडे, पद्धतीकडे वळाले. अर्थात ज्याला सप्रमाण कसलाच आधार नाही. जे सिद्ध असल्याचे दाखवता येत नाही, ज्याची चाचणी होऊ शकत नाही, त्यावर विज्ञान विश्वास ठेवत नाही. पण असं घडणार आहे, असं सांगणार्या व्यक्ती आणि त्यांची भाकीत तेल मीठ लावून सांगणारे तसूभरही कमी झालेले नाही. तर या भविष्यवेत्त्याने पण भारताविषयी अशीच काही अचाट भाकीत केली आहेत. कोण आहे ती व्यक्ती?
पीटर हर्कोस, नाव तर ऐकलेच असेल?
पीटर हर्कोस (Peter Hurkos), आपल्यातील बहुतांश लोकांना हे नाव अपरिचित आहे. पण ज्यांचा गूढवादी, मानसोपचार, मानसिक आजार यासंदर्भातील अभ्यास असेल, त्यांनी कदाचित हे नाव ऐकले असेल. तर हर्कोस हे हॉलंडचे सुप्रसिद्ध भविष्यवेत्ता होते, ज्यांना त्यांच्या अतींद्रिय क्षमतेसाठी ओळखले जायेच.




हर्कोस यांचा जन्म 21 मे 1911 रोजी हॉलंडमधील ड्रोड्रेक्ट येथे झाला होता. तरुणपणी जहाजावर शेफ म्हणून ते काम करत होते. एके दिवशी ते 50 फूट उंचीवरून पडले . त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अपघातानंतर ते 6 दिवस कोमामध्ये होते. या अपघातामुळे त्यांच्यात अतींद्रिय ज्ञानाची क्षमता विकसित झाली. ते व्यक्तीचा भूतकाळ सांगू लागले आणि भविष्यातील काही घटना पण त्यांनी सांगितल्या.
‘द सायकिक वर्ल्ड ऑफ पीटर हर्कोस’
हर्कोस यांच्या ज्ञानाचा पोलीस खात्याने कुशलतेने वापर केला. अनेक गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात त्यांची मदत घेतली. बोस्टन स्ट्रँगलर आणि मॅन्सन फॅमिली मर्डर्स या गाजलेल्या प्रकरणात हर्कोस यांनी मोलाची मदत केली. त्यांनी त्यांच्या जीवनावर ‘द सायकिक वर्ल्ड ऑफ पीटर हर्कोस’ हे पुस्तक लिहिले. ज्यामध्ये त्यांच्या अनुभवांचे वर्णन आहे. ते चांगले लोकप्रिय ठरले. 1 जून 1988 रोजी वेस्ट हॉलीवूड, कॅलिफोर्निया येथे हर्कोस यांचे निधन झाले.
भारत आणि हिंदुत्वाविषयी मोठं भाकीत
भारताबद्दल हर्कोस यांनी काही भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यांची ही भविष्यवाणी त्यावेळी गाजली होती. ओशो, चिन्मय मिशनसह अनेक संस्था त्यावेळी भारताबाहेर चर्चेत होत्या. त्याचवेळी त्यांनी भारत आणि हिंदुत्वाविषयी मोठं भाकीत केलं होते. त्यांनी एका कार्यक्रमात या भाकितांचा उल्लेख सुद्धा केला होता. भारताविषयी त्यांनी फार कमी भविष्यवाणी केली असली तरी, त्यांनी भारत हा विश्वगुरू होणार असल्याचे वारंवार म्हटल्याचा दावा केला जातो.
1. भारतातून आध्यत्मिकतेची लाट उसळेल, सर्व जगात ही लाट पसरेल
2. भारत संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करेल. भारत जगाचे मार्गदर्शन करेल
3. आध्यात्मिक वातावरणामुळे भारतात दहशतवाद्यांचा बिमोड होण्यास मदत होईल
4. मूळ सनातन धर्माचा शंखनाद होईल. भारत अध्यात्म आणि शांततेमुळे जगद्गुरु होईल.
डिस्क्लेमर : हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.