Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : एवढा भीषण अपघात पाहिला नसेल… रस्त्याच्या कडेच्या गार्डमध्ये घुसली कार आणि…

हायवे(Highway)वर ज्या प्रकारे कारचा अपघात (Accident) झाला त्याचा व्हिडिओ पाहून तुम्हाला मात्र हादरा बसेल. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की ड्रायव्हरला एकही ओरखडा पडलेला नाही.

Video : एवढा भीषण अपघात पाहिला नसेल... रस्त्याच्या कडेच्या गार्डमध्ये घुसली कार आणि...
कार अपघात आणि ड्रायव्हर
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 2:34 PM

Horrible car Accident : देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण आहे. त्याचा प्रत्यत नुकताच आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ(Video)मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळालं. हायवे(Highway)वर ज्या प्रकारे कारचा अपघात (Accident) झाला त्याचा व्हिडिओ पाहून तुम्हाला मात्र हादरा बसेल. अपघात अत्यंत भयंकर पद्धतीनं घडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की ड्रायव्हरला एकही ओरखडा पडलेला नाही. कसं ते मात्र समजू शकलेलं नसलं तरी हा व्हिडिओ अपघात झाल्यानंतरचा आहे. तो पाहिल्यानंतर याचा प्रत्यय येतो.

कार नियंत्रणाबाहेर

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्डला धडकली. गार्ड गाडीच्या मधोमध शिरतं आणि गाडीला फाडून पन्नास फूट ओलांडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओतल्या कारची अवस्था पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप वेगानं पाहिला गेला आहे. आपणही पाहू या हा व्हिडिओ…

मध्यभागी फाडलं

कारचा अपघात एवढा भीषण होता, की, गार्डनं कारला मधूनच फाडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. गाडीच्या आत गार्डही दिसते. आपण पाहू शकता, की ड्रायव्हरची सीट सुरक्षित आहे, गार्ड उर्वरित कार मध्यभागी फाडते. मात्र सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या धोकादायक अपघातानंतरही गाडीच्या चालकाला काहीही होत नाही. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेलं नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हिडिओमध्ये तुम्ही गाडीचा चालक पाहू शकता. भीषण अपघातात गाडीच्या चालकाला एक ओरखडाही पडला नाही. अपघातानंतर चालक गाडीतून उतरून रस्त्याच्या कडेला बसतो. व्हिडिओमध्ये तुम्ही गाडीचा ड्रायव्हर इतरांसोबत आरामात बसलेला पाहू शकता. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर punjabi_industry नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

Viral : संकटातही विचलित न होता कसं पडायचं बाहेर? या Videoतून खूप काही शिकायला मिळेल

Rat and Snake fight : पिल्लाला वाचवण्यासाठी उंदरानं घेतला सापालाच चावा, Video Viral

Video : स्वतःच्याच लग्नात पैसे लुटायला लागले वधू-वर; यूझर्स म्हणतायत, सर्व 36 गुण जुळले बहुतेक!

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.