मुंबई : माणून आणि प्राणी हे एकमेंकांशी बोलू शकत नसले तरी केवळ भावना समजूनही अनेकदा दोघांमध्ये एक वेगळेच नाते तयार होत असते. अनेक पाळीव प्राणी उदा. कुत्रा, मांजर आणि त्यांच्या मालकांतील नातं मन जिंकणारं असतं. प्राणी आपल्या मालकासाठी जीव द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. असंच एक मुलगी आणि तिच्या घोड्यातील गोड नातं दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये मुलीने पाळलेला घोडा तिचं दुख समजून घेताना दिसतो आहे. तसंच तिचं दुख कमी करण्यासाठी प्रयत्नही करत आहे. तर व्हिडीओमध्ये एक महिला मुद्दाम रडण्याचे नाटक करुन तिच्या पाळीव घोड्याजवळ गोठ्यात येऊन बसते. ज्यानंतर तिचा रडण्याचा आवाज ऐकताच चारा खाणारा घोडा तिच्याजवळ येऊन अगदी आपुलकीने उभा राहतो. जणून घोडा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेच व्हिडीओ पाहून वाटते. आता नेमका हा व्हिडीओ कसा आहे तुम्हीच पाहा…
रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला नेटकरी चांगलाच प्रतिसाद देत आहेत. तुम्हालाही व्हिडीओ पाहून अंदाज आलाच असेल घोडा आणि त्याच्या मालकिणीमधील गोड नात्याचा. तर या नात्यावर नेटकरीही खूप प्रेम करत असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस या व्हिडीओवर पडत आहे. लोकांना व्हिडीओ पाहून खूप छान वाटत असून कमेंट्समधून लोक त्यांचे मत मांडत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे, प्रत्येक प्राणी आपल्याला चांगल्या प्रकारे समजतो. आपणही त्यांना तसंच समजण्याची गरज आहे.
हेही वाचा :
नवरी दिसताच नवरदेव खुलला, वाजवली लग्नमंडपातच शिट्टी, मजेदार व्हिडीओ व्हायरल
फाडफाड इंग्रजी, कचरा वेचणाऱ्या आजींचं इंग्रजी ऐकून चकीत व्हाल!
(Horse saw the owner crying then came close to make her comfortable Viral video won hearts)