Horse swimming : घोड्याला कधी पोहताना पाहिलंय का? नसेल तर ‘हा’ Video तुमच्यासाठी आहे…
Animal video : कधी घोड्याला (Horse) पोहताना (Swimming) पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नक्की पाहा. घोडे पोहू शकतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Animal video : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. स्वत:ला थंड राहण्यासाठी प्रत्येकजण काहीतरी जुगाड करत असतो. उन्हाळ्यात सर्वांचे पाय वळतात, ते स्विमिंग पूलकडे. स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर आपले पोहण्याचे कौशल्य दाखवणार अनेकजण आहेत. हे झाले माणसाचे. पण प्राणीही पोहत असतात. काही प्राण्यांना पाण्यातच राहायला आवडते. तर काही प्राणी कधी कधी पाण्यात जातात. तुम्ही कधी घोड्याला (Horse) पोहताना (Swimming) पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नक्की पाहा. घोडे पोहू शकतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. घोड्यांची खोल पाण्यात पोहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. पाण्यात प्रवेश केल्यानंतर, घोडे त्यांचे पाय पॅडलसारखे हलवतात, ज्यावरून ते पोहतात. घोडे त्यांच्या विशाल फुफ्फुसांमुळे पोहण्यास सक्षम आहेत.
घेतोय पोहण्याचा आनंद
घोडे पाण्याखाली श्वास घेण्यास असमर्थ असल्याने ते नैसर्गिकरित्या त्यांचे डोके पाण्याच्या वर ठेवतात. त्यांचे तोंड आणि नाक पाण्याच्या वर ठेवल्याने त्यांना श्वास घेण्यास मदत होते. तथापि, जेव्हा घोडा पाण्याखाली असतो तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि जड श्वास घेण्याची शक्यता असते. पोहणे घोड्यांसाठी फायदेशीर आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तपकिरी घोडा तलावात पोहताना दिसत आहे. घोडा त्याच्या पोहण्याचा आनंद घेत असल्याचे दिसते आणि तो कॅमेराकडेही पाहत आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर पोस्ट
‘naturre‘ पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्याला 4,400हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. घोडा पोहताना पाहून नेटिझन्सला धक्का बसला आणि त्यांना वाटले की हे विचित्र दृश्य आहे. एका यूझरने लिहिले, की मी माझ्या आयुष्यात कधीही घोडा पोहताना पाहिला नाही.’ दुसर्या यूझरने लिहिले, की पोहणारा घोडा पाहणे खूप सुखदायक वाटते. इतर अनेक यूझर्सनीही कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या.