पहिल्यांदाच असं घडलं… हॉट बलूनला आकाशात गेल्यावर आग लागली; त्यानंतर बलूनमधील प्रवाशांनी उंचावरूनच…

अमेरिकेच्या जवळच असलेल्या मेक्सिकोमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. हवेत उडालेल्या हॉट एअर बलूनला मोठी आग लागली. त्यामुळे बलूनमधून उडणाऱ्या प्रवाशांची एकच धांदल उडाली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

पहिल्यांदाच असं घडलं... हॉट बलूनला आकाशात गेल्यावर आग लागली; त्यानंतर बलूनमधील प्रवाशांनी उंचावरूनच...
hot-air balloonImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 7:44 AM

मेक्सिको : हवेत उडणाऱ्या हॉट एअर बलूनला आग लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग लागल्यानंतर बलूनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बलूनमधून उंचावरूनच उडी घेतली. या दुर्घटनेत एक मुलगाही भाजला आहे. ही घटना अमेरिकेजवळच्या मेक्सिकोमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पहिल्यांदाच आकाशात गेलेल्या हॉट एअर बलूनला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियातून तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

मेक्सिकोच्या सरकारनेही या घटनेची पृष्टी केली आहे. हॉट एअर बलूनला आग लागल्यानंतर बलूनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी धडाधड उड्या मारली. या दुर्घटनेत आगीत होरपळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगा भाजला आहे. हा बलून मेक्सिको सिटीपासून 70 किलोमीटर लांब उत्तर-पूर्व येथील टियोतिहूआकैन पुरातत्त्व स्थळावर ऊंचावर उडत होता. हॉट एअर बलूनमधून प्रवास करण्यासाठीचं हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. बलूनमधून अवकाशाची सफर करण्यासाठी या ठिकाणी शेकडो लोक येत असतात.

महिलेचा मृत्यू

बलूनला लागलेल्या आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका 39 वर्षीय महिलेचा आणि एका 50 वर्षीय व्यक्तिचा समावेश आहे. मात्र, त्यांची नावे कळू शकले नाहीत. तर आगीत एक मुलगा भाजला आहे. त्याचा चेहरा खूप भाजला आहे. त्याच्या पायालही फ्रॅक्चर झालं आहे.

व्हिडीओ सोशल मीडियात

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात उडत्या बलूनला कशी आग लागलीय हे दिसून येते. आग लागल्यानंतर प्रवाशांची सुरू असलेली आरडाओरडही या व्हिडीओतून ऐकायला मिळत आहे. काही लोक भीतीने बलूनमधून उडी मारतानाही दिसतत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ही घटना किती भयंकर होती, त्याचा अंदाज येतो.

15 हजार लोकांनी व्हिडीओ पाहिला

हा व्हिडीओ एका व्यक्तीने ट्विटरव शेअर केला आहे. हा व्हिडीओ 15 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक यूजर्स त्यावर रिअॅक्ट झाले आहेत. एका यूजर्सने तर प्रचंड भयावह दृष्य होतं असं म्हटलंय. तर दुसऱ्याने सर्व्हिस प्रोव्हायडरवर कारवाईची मागणी केली आहे. एका यूजर्सने तर साहसी घटनांमध्ये रिस्क असतेच, असं म्हटलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.