Video | एका बाईकवर 7 माणसं, 2 कुत्री आणि 2 कोंबडी कशी बसली, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल हैराण

सोशल मिडीयावर अनेक चित्रविचित्र व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. या व्हिडीओत एकाच मोटारसायकल पूर्ण कुटुंबकबिला घेऊन जाताना एक अवलीया दिसत आहे.

Video | एका बाईकवर 7 माणसं, 2 कुत्री आणि 2 कोंबडी कशी बसली, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल हैराण
bike Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 6:21 PM

नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : आपला भारत देश म्हणजे निरनिराळ्या जुगाडांचा देश आहे. येथे रोजचे जगणं सुसह्य करण्यासाठी लोक आपल्या पद्धतीने जुगाड करीत जीवनाचा खरा आनंद लुटत असतात. सोशल मिडीयावर असे भन्नाट व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकीत होत असतो. असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हीही विचारात पडला, की हे झालं कसं ! या व्हिडीओत एक व्यक्ती आपलं संपूर्ण बिऱ्हाडच घेऊन आरामात प्रवास करताना दिसत आहे. तुम्ही गाडीवरील व्यक्ती मोजून दमाल आणि तुमच्या गालावर आपसूकच हसू येईल !

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रमाणे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहीले असतील. सर्वसाधारणपणे एका मोटारसायकलवर दोन जणांना बसायला परवानगी असते. परंतू बरेचदा बाईकवर तीन व्यक्ती बसून प्रवास करताना आपल्याला दिसतात. यास वाहतूक नियम आड येत असले तरी ग्रामीण भागात एवढं कोणी लक्ष देत नाही. परंतू या व्हिडीओत दिसणाऱ्या मोटारसायकलीवर दोन-तीन नव्हे तर चक्क 11 जण प्रवास करताना दिसत आहेत. त्यात सात मानव आहेत तर दोन कुत्री आणि दोन कोंबडी यांचा समावेश आहे. या सोबत घरातील सर्व सामानसुमानही बाईकवर ठेवण्यात आले आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by purvanchal (@purvanchal51)

या मोटारसायकलवर संपूर्ण कुटुंबकबिला सामावल्याचे दिसत आहे. असं वाटतंय की बाईक नव्हे मालवाहू वाहनच आहे. कुटुंब प्रमुख बाईक चालवित असल्याचे दिसत असून पाठी त्याची पत्नी आणि पाच मुले आई-वडीलांना बिलगुन बसलेली दिसत आहेत. या शिवाय एका मुलाच्या हातात दोन कोंबड्या आहेत. पुढे एक आणि साईडला एक अशी दोन कुत्री देखील बसलेली दिसत आहेत. या बाईकला घरातील सामान डब्बे, बादल्या, बोचकी लावलेली दिसत आहेत.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.