भारतातच नाही, ‘या’ देशातही दिवाळीचा जल्लोष; दिवाळीची भव्यता, संस्कृती अजूनही गुंफलेली
पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला असला, तरी दोन्ही देशांची सांस्कृतिक मुळं अजूनही एकमेकांत गुंफलेली आहेत. या बंधाचे एक उदाहरण नुकतेच एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील कराचीमध्ये दिवाळीचा भव्य उत्सव दाखवण्यात आला आहे. यावेळी भारतीयांप्रमाणे कराचीतही ठिकठिकाणी दिव्यांची भव्यता दिसत आहे. हा व्हिडिओ भारतीय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहिला की तुम्ही म्हणाल हा दिवाळीचा व्हिडिओ म्हणजे भारतामधलाच आहे. पण, हा व्हिडिओ पाकिस्तानच्या कराचीतला आहे. यातील दिव्यांची भव्यता आणि आनंदाचे क्षण पाहून तुम्हालाही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावा वाटेल.
पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर बिलाल हसन यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपला दिवाळीचा अनुभव शेअर केला असून दिवाळी साजरी करणाऱ्या लोकांनी भरलेल्या स्वामी नारायण मंदिराचे वातावरण दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये मंदिराची चमक, फटाक्यांची आतषबाजी आणि तिथे उपस्थित कुटुंब आणि मित्र परिवाराच्या आनंदाचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. कंटेंट क्रिएटर बिलाल हसन यांनी दिवाळीच्या सणाशी निगडित एका विशिष्ट परंपरेची आठवण करून दिली, ज्यात त्यांनी आपल्या मित्रांना पैशांचे लिफाफे भेट दिले आणि त्यांच्या मित्रांनी मिठाई देऊन त्यांना प्रतिसाद दिला.
लोकांची प्रतिक्रिया काय होती?
या व्हिडिओला आतापर्यंत 21 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, ‘वेगवेगळ्या संस्कृती एकत्र सण साजरा करताना पाहून मन प्रसन्न होतं.’ आणखी एकाने म्हटले की, ‘दिवाळी सर्वत्र साजरी केली जाते, ती खरोखरच लोकांना एकत्र आणते.’ कुणीतरी लिहिलं की, ‘कराचीमध्ये दिवाळीचा असा उत्सव बघून छान वाटलं.’
तर एका युजरने या रंगीबेरंगी सणाबद्दल आनंद व्यक्त करत लिहिलं की, ‘सण कोणत्याही धर्माचा विचार न करता प्रत्येकाने साजरे केले पाहिजेत.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘या व्हिडिओने माझा दिवस बनवला. हे आपल्या सामायिक माणुसकीचे सुंदर प्रतिनिधित्व आहे.’ बिलालचे आभार मानत एका व्यक्तीने लिहिले, ‘हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद, पाकिस्तानात दिवाळीचा आनंद पाहणे अविश्वसनीय आहे.’
View this post on Instagram
कराचीतील नवरात्रोत्सवाचा व्हिडिओही व्हायरल
या वर्षाच्या सुरुवातीला कराचीमध्ये नवरात्रीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यामध्ये इन्फ्लुएंसर धीरेज मानधन यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यात कराचीतील एक रस्ता उजळून निघाला होता, जिथे देवी दुर्गा मातेची भव्य मूर्ती होती आणि महिला आणि मुले गरबा आणि दांडिया खेळताना दिसत होती. पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर बिलाल हसन यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने तो खूप व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.