या चित्रात तुम्हाला एकूण किती प्राणी दिसतायत? कुठले कुठले प्राणी दिसतायत सांगा बघू…
या चित्राची गंमत म्हणजे जवळजवळ काळ्या-पांढऱ्या रंगाप्रमाणे दिसणाऱ्या या चित्रात सर्वच प्राणी दिसत नाहीत.
हे चित्र एक प्रकारचं ऑप्टिकल भ्रम आहे. ऑप्टिकल भ्रमाचं चित्र पाहताना आपण फसतो. आपल्याला दिसतं तेच सत्य नसतं बरेचदा आपण पाहतो ते वेगळं असतं आणि त्यात जे असतं ते वेगळं असतं. इतकेच नव्हे तर एखाद्या चित्राबद्दल बोलताना आपला मेंदू कसा काम करतो हे समजण्यासही ऑप्टिकल इल्युजन शास्त्रज्ञांना मदत करतात. आता हे एक चित्र आहे यात नेमके किती प्राणी आहेत ते सांगा. या चित्रात अस्वल दिसत असलं तरी अजूनही अनेक प्राणी या चित्रात आहेत.
या चित्राची गंमत म्हणजे जवळजवळ काळ्या-पांढऱ्या रंगाप्रमाणे दिसणाऱ्या या चित्रात सर्वच प्राणी दिसत नाहीत. अस्वलाच्या मागे अनेक छोटे प्राणी असल्याचे चित्र दिसून येते.
परंतु सर्व प्राण्यांमध्ये किती प्राणी आहेत हे जर तुम्हाला कळून येत नसेल तर आम्ही तुम्हाला याचं योग्य उत्तर सांगतो.
प्रत्यक्षात या चित्रात केवळ सहा प्राणी आहेत. यामध्ये अस्वल, कुत्रे, मांजर, वटवाघळे, माकडे आणि खारीचा समावेश आहे.
यात अस्वल आधी दिसून येतोय. अस्वलाच्या मागे इतर प्राणी आणि अस्वलाच्या शेपटीवर खार आहे. सर्व प्राणी दिसत नाहीत असे हे चित्र तयार करण्यात आले होते, पण नीट निरखून पाहिले तर तेथे कोण आणि किती प्राणी आहेत हे कळते.