Aadhaar Card : आधारकार्डचा फोटो बदलायचा आहे? वापरा ‘ही’ सोपी पद्धत
आधारकार्डवरील फोटो बदलवण्यासाठी नेमकं करावं याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत (how to change photo of Aadhar card).
मुंबई : तुमचा आधारकार्डवरचा फोटो तु्म्हाला आवडत नाही आणि तो तुम्हाला बदलायचा आहे का? किंवा तसा विचार तुम्ही करत आहात का? मात्र, त्यासाठी खूप खर्च येईल, असं तुम्हाला वाटतंय का? किंवा कोणत्यातरी सरकारी कार्यालयात जाऊन तुम्हाला तासंतास उभं राहून फोटो बदलावा लागेल, असं तुम्हाला वाटतंय का? तसं असेल तर तुमच्यासाठी आम्ही आज महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. आधारकार्डवरील फोटो बदलवण्यासाठी नेमकं काय करावं याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. त्याचबरोबर त्यासाठी काही खर्च येईल का? याचीदेखील माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत (how to change photo of Aadhar card).
आधारकार्डवरील फोटो बदलण्यासाठी काय करावं?
प्रत्येक नागरिकासाठी आधारकार्ड बनवणं हे अनिवार्य आहे. कारण प्रत्येक सरकारी कामासाठी जिथे तुम्हाला स्वत:ची ओळख संबंधित कागदपत्रे जमा करायचे असतात तिथे आधारकार्डची झेरॉक्स कॉपी जमा करावी लागते. UIDAI आधारकार्डवरील माहिती जसं की नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि फोटो बदलण्यासाठी ऑनलाईन सुविधा देत होते. मात्र, आता ही ऑनलाईन सुविधा फक्त पत्ता बदलण्यासाठी देण्यात येते. त्यामुळे आता तुम्हाला नाव, मोबाईल नंबर, जन्म तारीख, ई-मेल आयडी, फोटो बदलण्यासाठी ऑफलाईन अर्ज कारावा लागतो. फोटो बदलायचा असल्यास तुम्हाला जवळच्या आधारकार्ड केंद्रात किंवा पोस्टाद्वारे अर्ज कारावं लागेल (how to change photo of Aadhar card).
आधारकार्डवरील फोटो बदलण्यासाठी काही सोप्या पद्धती
1) सर्वात आधी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईठवर जावं लागेल. तिथे Get Aadhaar सेक्शनवरमध्ये जाऊन अपडेटचा फॉर्म डाऊनलोड करा. 2) संबंधित फॉर्मला भरा. त्यानंतर तुमच्या जवळील आधारसेंटरमध्ये फॉर्म जमा करा. तिथे तुमच्या बोटाचे ठशे, डोळे स्कॅन आणि चेहरा पुन्हा एकदा कॅप्चूअर केला जाईल. 3) फोटो अपडेट करण्याचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर लगेच तुम्हाला यूआरएन किंवा अपडेट रिक्वेस्ट मोबाईलवर येईल. याच नंबरच्या आधारावर तुमचा नवा फोटो अपडेट होईल. 4) त्यानंतर पुढच्या 90 दिवसात तुम्हाला नव्या फोटोसह नवं आधारकार्ड पोस्टाने मिळेल
हेही वाचा : चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत