UPSC मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा! व्हिडीओ व्हायरल
यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी एक नवी युक्ती व्हायरल होत आहे. अत्यंत कठीण परीक्षांमध्ये UPSC चं नाव येतं.
युपीएससीच्या परीक्षेची अनेक वर्षे लोक तयारी करतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इच्छुकांना आयएएस, आयपीएस आणि आयएफएस असे पद दिले जाते. उमेदवार विविध विषयांची तयारी केल्यानंतर पूर्व, मेन्स परीक्षा देतात आणि त्यात उत्तीर्ण झाल्यावर मुलाखतीला सामोरे जावे लागते. यूपीएससीशी संबंधित नवनवीन बातम्या रोज ऐकायला मिळतात. अनेक वेळा आयएएस अधिकाऱ्यांचे यशाचे मंत्रही आपल्याला वाचायला मिळतात.
सध्या आयएएस अधिकारी आजकाल ट्विटरवर प्रेरणादायी आणि मजेशीर ट्विट शेअर करत असतात आणि लोकही मोठ्या आवडीने त्यांना फॉलो करतात.
मात्र, यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी एक नवी युक्ती व्हायरल होत आहे. अत्यंत कठीण परीक्षांमध्ये यूपीएससीचं नाव येतं. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्लिअर करणं सोपं नाही.
आयएएस परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणारे फार कमी लोक आहेत. जे विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होतात, त्यांचं यश संपूर्ण कुटुंब आणि मित्र साजरं करतात. मात्र, नापास झालेले विद्यार्थी पुन्हा प्रयत्नात गुंतून पडतात.
यूपीएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल होऊ लागतात. इतकंच नाही तर काही लोक मीम्सही शेअर करतात.
मीम शेअर करणाऱ्या युजरचे ट्विट पाहून तुम्हाला चेहऱ्यावर हसू येईल. होय, एका वापरकर्त्याने यूपीएससी पहिल्याच प्रयत्नात क्लिअर करण्याची ट्रिक सांगितलीये.
ही पद्धत पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईलच, पण तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही ते शेअर करावंसं वाटेल. ट्विटमध्ये असे पाहायला मिळत आहे की, युझरने दोन फोटो शेअर केले आहेत.
Cleared UPSC in first attempt. ? pic.twitter.com/jE8bua8QIt
— Unsocially M’idiotic (@m_idiotic) September 27, 2021
पहिल्या चित्रात पेन्सिलवरून कॉपीवर यूपीएससी लिहिली आहे, तर दुसऱ्या चित्रात ती रबराने पुसली गेलेली दाखवली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, “यूपीएससी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली.” ट्विटरवरील @m_idiotic नावाच्या एका अकाऊंटने ही पोस्ट शेअर केली आहे.