21 व्या वर्षी कसे दिसत होते प्रभू श्रीराम? नितळ, तेजस्वी, सुंदर.. चित्त प्रसन्न करणाऱ्या Photo वर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव
देशातीलच नव्हे तर जगभरातील रामभक्तांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफ्फान व्हायरल होतोय. विज्ञान-तंत्रज्ञान आणि आध्यात्मिकतेचा हा मिलाप सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
मुंबई : दूरदर्शनवरील महाभारत (Mahabharat) आणि रामायण (Ramayan) या दोन ऐतिहासिक मालिका ज्यांनी पाहिल्या, त्यांच्या डोळ्यासमोर राम आणि कृष्ण म्हटलं की त्या त्या मालिकेतील पात्र उभे राहतात. अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये मूर्ती स्वरुपात दिसणारे राम आणि कृष्ण मानवी रुपात असताना कसे दिसत असतील, असा प्रश्न अनेकांना पडत असेल. मालिकांच्या रुपांतून मानवी स्वरुपातील राम-कृष्ण साकारले गेले. मात्र प्रत्यक्ष मानवी रुपातील राम कसे दिसत असतील, हे साकारण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेण्यात आली आहे. AI च्या मदतीने तयार केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. २१ व्या वर्षी प्रभू श्रीराम कसे दिसत असतील, याचा अभ्यास करून हा फोटो तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. हा फोटो नेमका कुणी तयार केला, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर श्रीरामाचं हे मनोहारी रुप पाहून भक्तांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.
#ShriRam My civilization Icon & everyone of us roll model, Ideal Human on this earth “Shree Ram”
Note – AI generated photo of “Shree #Ram ” based on description given various #Shastras #trending
© Unknown pic.twitter.com/xfOh9PglzA
— Shipan Das (@ShipanDas001) April 12, 2023
प्रभू श्रीरामाचं हे सुंदर रुप पाहून अनेकांनी मन शांत, प्रसन्न झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर काही म्हणालेत, एवढे हँडसम आतापर्यंत या पृथ्वीवर कुणी दिसलेच नाहीत. इंटरनेटवर हा फोटो खूप शेअर केला जातोय. प्रत्येकजण या फोटोतून आपल्याला भावलेले राम कसे आहेत, यावर प्रतिक्रिया देतंय.
अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये हिंदू देवी देवतांचे वर्णन केलेले आहे. अनेक स्तोत्रांमधूनही देवतांच्या रुपाचं वर्णन आढळून येतं. थोडा अर्थ समजून घेतला तर त्या त्या देवतेचं रुप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, असा अनेकांचा अनुभव असतो. वाल्मीकी रामायण, रामचरितमानससह अनेक ग्रंथांमधून प्रभू श्रीरामांचं जे वर्णन केलंय, त्याचाच अभ्यास करून AI च्या मदतीने हा फोटो तयार केल्याचं म्हटलं गेलंय.
एका यूझरने लिहिलंय. आर्टिफिशिअल फोटोच एवढा सुंदर असेल तर प्रत्यक्षात राम किती सुंदर दिसत असतील. तर एकाने लिहिलंय वाल्मीकी रामायण आमि राम चरितमानससह सर्व ग्रंथांतील माहितीचा अभ्यास करून हा फोटो तयार करण्यात आलाय. त्यामुळे २१ व्या वर्षातील रामाचं हे रुप तंतोतंत योग्य असावं, असं वाटतंय. २१ व्या वर्षी राम खरोखरच असेच दिसत असतील…
राम नाम जितकं सुंदर तितकंच रुप मनोहारी प्रभू श्रीरामाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफ्फान व्हायरल होतोय. मात्र हा फोटो नेमका कुणी बनवला आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. फोटो कुणीही बनवला असो, त्या व्यक्तीच्या क्रिएटिव्हिटीवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. एकाने या फोटोवर लिहिलंय… जैसा सुंदर नाम उतना सुंदर हमारे राम…
हल्ली AI ने तयार केलेले अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. त्यातच आता प्रभू श्रीरामांचा एवढा सुंदर फोटो तयार करण्यात आल्याने राम भक्तांसाठी हे रुप पाहणं आनंदाची अनुभूती देणारा ठरतोय.