Video | स्टेडियममध्ये मॅच बघत होती तरूणी, कॅच पकडायला गेली आणि… पाहा व्हिडीओ

एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ही तरूणी स्टॅन्ड्समध्ये बसून मॅच पाहतेय, आणि तिच्याकडे आलेला बॉल पकडायला गेल्यावर तिची चांगलीच फजिती झालीय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो जबरदस्त व्हायरल होतोय. नेटिझन्स या तरूणीचे हावभाव पाहून हसून बेजार झालेत.

Video | स्टेडियममध्ये मॅच बघत होती तरूणी, कॅच पकडायला गेली आणि... पाहा व्हिडीओ
viral video
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 3:18 PM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना टीव्हीपेक्षा प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन कुठल्याही खेळाचे सामना पाहायला आवडतात. स्टेडियमवर प्रत्यक्ष जाऊन मॅच पाहण्यात वेगळा आनंद तर मिळतोच शिवाय, तिथं ज्या गमतीजमती होतात त्या अतिशय भन्नाट असतात. स्टेडियममध्ये मॅच बघायला आलेल्या अशाच एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ही तरूणी स्टॅन्ड्समध्ये बसून मॅच पाहतेय, आणि तिच्याकडे आलेला बॉल पकडायला गेल्यावर तिची चांगलीच फजिती झालीय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो जबरदस्त व्हायरल होतोय. नेटिझन्स या तरूणीचे हावभाव पाहून हसून बेजार झालेत. (Humorous video of a young woman coming to the stadium to watch a baseball match is going viral)

काय आहे व्हिडीओ

व्हिडीओमध्ये एक तरूणी आपल्या मित्रांसोबत बेसबॉलची मॅच पहायला आली आहे. यावेळी खेळाडूने मारलेला बॉल तिच्या दिशेने येतो, ती बॉल पकडण्यासाठी उत्साहित होऊन पुढे येते आणि कॅच पडणार तेवढ्यात तिच्या समोर असलेला छोटा मुलगा बॉल पकडतो आणि या तरुणीची फजिती होते.

सुरूवातीला आपण कॅच पकडणारच असा आत्मविश्वास तरूणीच्या चेहऱ्यावर असतो, पण तेवढ्यात समोरचा मुलगा कॅच पकडतो आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलून जातो. तरूणीची फजिती झाल्याने तिच्यासोबत आलेले तिचे मित्र जोरजोरात हसू लागतात आणि त्यामुळे ही मुलगी शरमेनं लाल होते.

तरूणीच्या शेजारी बसलेला तिच्या मित्राने तर तिच्या फजितीची पूर्ण मजा घेतली. पण नंतर एका चांगल्या मित्राप्रमाणे तिच्या खांद्यावर हात ठेवत, ”जाऊदे, असं होत असतं. वाईट वाटून घेऊ नको”, असं म्हणत तिची समजूत काढली.

या तरूणीच्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सही या व्हिडीओला पाहून खळखळून हसले. अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. ‘गजब बेज्जती हो गई यार’, ‘वाह बेटे मौज कर दी’ अशा काही मजेशीर कमेंट्स या व्हिडीओखाली आल्या आहेत. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 1 लाख व्ह्यूज आले आहेत तर अनेकांनी तो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअरही केला आहे.

संबंधित बातम्या :

Video | फोटो काढण्याच्या नादात थेट पाण्यात, फोटोग्राफरला पाहून नवरी-नवरदेव घाबरले, व्हिडीओ पाहाच

Video | अद्भूत आणि अजब ! जगातील सर्वात उंच इमारतीवर सुंदर महिला, धाडसाला नेटीझन्सचा सलाम !

Viral | ढोल-ताशाचा आवाज ऐकून बेभान, जमिनीवर लोळून नाचायला लागला, नंतर बसला मार, व्हिडीओ व्हायरल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.