Husband Day Care Centre! कुठेही जायचं असेल, इथे नवऱ्याला सोडा, पूर्ण काळजी घेतली जाईल
जोडपीही न्यूक्लिअर राहणे पसंत करत असल्याने अशा परिस्थितीत मुलांना डे केअरमध्ये ठेवण्याशिवाय पालकांकडे दुसरा पर्याय नसतो. सक्तीने लोक आपल्या मुलांना डे केअरमध्ये ठेवतात. मात्र, यात कोणतीही अडचण नाही. डे केअरमध्ये मुलांची काळजी घेतली जाते. त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतली जाते.
मुंबई: आजचा काळ असा झाला आहे की आई आणि वडील दोघेही नोकरी करत आहेत. अशा वेळी मुलांची काळजी घेणे ही मोठी समस्या बनलीये. आजकाल जोडपीही न्यूक्लिअर राहणे पसंत करत असल्याने अशा परिस्थितीत मुलांना डे केअरमध्ये ठेवण्याशिवाय पालकांकडे दुसरा पर्याय नसतो. सक्तीने लोक आपल्या मुलांना डे केअरमध्ये ठेवतात. मात्र, यात कोणतीही अडचण नाही. डे केअरमध्ये मुलांची काळजी घेतली जाते. त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतली जाते. पण हे झालं लहान मुलांसाठी. तुम्ही कधी विचार केला आहे का की चाइल्ड डे केअरप्रमाणेच नवरा डे केअर सेंटर असू शकतं? होय, अशाच एका पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
आनंद महिंद्रा यांना तुम्ही ओळखत असालच. देशातील या नावाजलेल्या उद्योगपतीने आपल्या ट्विटर हँडलवर ही मजेशीर पोस्ट शेअर करत या अनोख्या इनोव्हेशनचे कौतुक केले आहे. आनंद महिंद्रा यांनी ही पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘इनोव्हेशन म्हणजे केवळ नवीन उत्पादने तयार करणे नव्हे. हे विद्यमान उत्पादन श्रेणीसाठी पूर्णपणे नवीन वापराच्या गोष्टी तयार करण्याबद्दल देखील आहे! शानदार’.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक बोर्ड आहे, ज्यावर लिहिले आहे, ‘हसबँड डे केअर सेंटर. तुम्हाला स्वत:साठी वेळ हवा असेल, विश्रांती घेण्यासाठी किंवा शॉपिंगला जाण्यासाठी वेळ हवा असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला आमच्यासोबत सोडू शकता’ असंही बोर्डावर लिहिलं आहे. ‘आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेऊ. तुम्हाला फक्त त्यांच्या ड्रिंक्ससाठी पैसे मोजावे लागतील.’
Innovation is not just creating new products. It’s also about creating entirely new use-cases for an existing product category! Brilliant. ? pic.twitter.com/8rDMI91riJ
— anand mahindra (@anandmahindra) April 28, 2023
लोकांना ही मजेशीर पोस्ट खूप आवडत आहे. त्याला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले असून युजर्स विविध प्रकारच्या मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मी फक्त अंदाज बांधत आहे की आपल्या पतीला इथे कोण सोडणार. दुकान आतून बघणंही महत्त्वाचे आहे’, तर आणखी एका युजरने ‘ही एक मजेदार संकल्पना आहे’, असे लिहिले आहे.