बटाट्याच्या पराठ्यावरून पती-पत्नीत भांडण, एकाचा मृत्यू!
बटाट्याच्या पराठ्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यात एकाचा मृत्यू झाला.
पती-पत्नीमध्ये भांडणं ही काही नवी गोष्ट नाही, अशी प्रकरणं समोर येत राहतात, पण ही भांडणं काही वेळा पुढे जाऊन खूप गंभीर रूप धारण करतात. बटाट्याच्या पराठ्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यात पतीचा मृत्यू झाला, अशी एक घटना समोर आली आहे. मात्र, यानंतर आणखी नवे खुलासे झालेत.
वास्तविक ही घटना उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पतीचे नाव लक्ष्मण आहे, त्याचे लग्न 7 वर्षांपूर्वी बुलंदशहर येथील एका तरुणीसोबत झाले होते.
अलीकडेच पतीने पत्नीला बटाट्याचा पराठा खाण्यासाठी मागितला, त्यानंतर यावरून त्यांच्यात प्रचंड वाद झाला. त्या बटाट्याच्या पराठ्यावरून वाद इतका वाढला की दोघंही घर सोडून बाहेर पडले.
काही वेळातच सिव्हिल लाइन्स परिसरात रेल्वे रुळावर पतीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सापडताच तिथे खळबळ उडाली.
मृताच्या कुटुंबीयांनी पत्नीला पोलिसांच्या हवाली केलं आणि पत्नीने आपल्या मेहुण्यासह आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पत्नी आणि तिच्या मेव्हण्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.
पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपासही सुरू झाला आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, गुरुवारी रात्री पतीने पत्नीकडे जेवणासाठी बटाट्याचे पराठे मागितले होते.
यामुळे पत्नीला राग आला आणि तिने पतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्यानंतर पती रागाने बाहेर गेला पण तिथेच त्याची हत्या करण्यात आली.