Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | गुलाबाची फुलं टाकून केलं स्वागत, पण मध्येच बायको भडकली, पाहा नेमकं काय घडलं ?

सध्या असाच एका पती-पत्नीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पतीने आपल्या पत्नीचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं आहे. सुरुवातीला अगदी आनंदात पत्नीचे स्वागत करून पतीने आपल्या पत्नीला थेट स्वयंपाक घरात भांडी घासण्यासाठी पाठवले आहे. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | गुलाबाची फुलं टाकून केलं स्वागत, पण मध्येच बायको भडकली, पाहा नेमकं काय घडलं ?
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 7:39 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजचे वेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना ना पाहून आपण थक्क होऊन जातो. पती आणि पत्नी यांच्यातील रुसवा-फुगवा आणि त्यांच्यातील भांडणाचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर विशेष रूपाने चर्चिले जातात. सध्या असाच एका पती-पत्नीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पतीने आपल्या पत्नीचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं आहे. सुरुवातीला अगदी आनंदात पत्नीचे स्वागत करून पतीने आपल्या पत्नीला थेट स्वयंपाक घरात भांडी घासण्यासाठी पाठवले आहे. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (husband grand welcome of wife with help of roses funny video went viral on social media)

पत्नीच्या स्वागतासाठी घर सजवलं

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पतीने आपल्या पत्नीसोबत चांगलीच मस्करी केली आहे. पत्नी बाहेरून घरी येत असल्यामुळे पतीने पूर्ण घर सजवले आहे. त्याने घरात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. तसेच गुलाबाचे फुलं सुद्धा ठेवले आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांच्या मदतीने त्याने एक रस्ता तयार केला आहे. त्यानंतर थोड्या वेळाने पत्नीने घरात प्रवेश केल्याचं आपल्याला दिसतंय.

नंतर महिला थेट स्वयंपाक घरात पोहोचली

आपल्या पतीने आपल्या स्वागतासाठी घेतलेली मेहनत पाहून पत्नी हरखून गेलीये. आश्चर्यचकित होऊन पत्नीने घरात प्रवेश केला आहे. तसेच रिबीन कापून व्हिडीओतील महिला घरामध्ये आल्याचे दिसत आहे. मात्र शेवटी महिलेसोबत एक विचित्रच प्रकार घडलाय. घरात चालत चालत गेल्यानंतर महिला थेट स्वयंपाक घरामध्ये पोहोचली आहे. स्वयंपाक घरात पाहोचल्यानंतर व्हिडीओतील महिला अतिशय चिडली आहे. कारण स्वयंपाक घरामध्ये भांडी घासण्यासाठी ठेवलेले आहेत. हे सर्व भांडी तिला घासावे लागणार आहेत. म्हणूनच व्हिडीओतील महिला चिडली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

किचनमधील भांडी घासावी लागणार म्हणून महिला रागाने लाल झाली असून ती निघून गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा सारा प्रसंग पाहून नेटकरी पोट धरून हसत आहे. तसेच व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही, मात्र त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

इतर बातम्या :

Video |पिळदार देह, मनात दृढनिश्चय, पठ्ठ्याने कोणत्याही आधाराविना रॉडवर साधलं बॅलेन्स

फक्त 5 व्हिडीओ आणि तरी लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर, असं काय आहे ह्या बंगाली यूट्यूब चॅनलमध्ये?

जंगलाच्या राजाकडून गिधाडाची शिकार, Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय चपळाई आहे!’

(husband grand welcome of wife with help of roses funny video went viral on social media)

महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.