ग्रामीण भारत आणि तंत्रज्ञान! व्हिडीओ व्हायरल, आयएएस अधिकाऱ्याकडून कौतुक
खरंतर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. प्रशासकीय अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा ग्रामीण भारताचा जुगाड असल्याचे म्हटले आहे.
![ग्रामीण भारत आणि तंत्रज्ञान! व्हिडीओ व्हायरल, आयएएस अधिकाऱ्याकडून कौतुक ग्रामीण भारत आणि तंत्रज्ञान! व्हिडीओ व्हायरल, आयएएस अधिकाऱ्याकडून कौतुक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/24234942/Awanish-Sharan.jpg?w=1280)
भारतात अनेकदा दिसून येतं, लोक विशेषत: खेड्यापाड्यातील लोक जुगाडच्या जोरावर सर्वात मोठे काम करतात. शेतकरीही यात मागे राहिलेले नाहीत. अनेक वेळा त्याचे व्हिडिओही व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत बैल आणि गाईचा वापर करण्यात आलाय. तेही शेतीच्या तंत्रज्ञानासाठी. एका आयएएस अधिकाऱ्याला हा व्हिडीओ आवडलाय. पण लोकांना काय हा व्हिडीओ फारसा पचलेला नाही.
खरंतर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. प्रशासकीय अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा ग्रामीण भारताचा जुगाड असल्याचे म्हटले आहे.
ट्रेडमिलसारखी दिसणारं हे मशीन आहे. बैल किंवा गाय फिरताना या व्हिडिओत दिसते. हे मशीन पंपिंग सेटला जोडलेले आहे.
व्हिडीओ
RURAL INDIA Innovation. It’s Amazing!! pic.twitter.com/rJAaGNpQh5
— Awanish Sharan (@AwanishSharan) September 23, 2022
व्हिडिओत बघितल्यावर कळेल हे मशीन पंपिंग सेटला जोडलेले आहे, या मशीनमधून पाणी बाहेर येत आहे. हा संपूर्ण सेटअप एका शेताजवळ बसवण्यात आला आहे.
हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, हे सांगण्यात आलेलं नाही. बैल सतत चालतोय आणि यंत्राच्या दुसऱ्या टोकाला पाणी सतत वेगाने बाहेर पडत असते, हे फक्त दिसून येते.
जमिनीतून पाणी उपसण्याचे तंत्र पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते, पण अनेकांना ते आवडलेले नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरचं म्हणणं आहे की, प्राण्यांवर अत्याचार का करत आहोत. संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, काही लोकांना हे इनोव्हेशन आवडलंही आहे.