बांगड्या विकणाऱ्या आईचा लेक IAS झाला, पण झगमगाट अंगाला शिवला नाही, IAS रमेश घोलप यांचा प्रेरणादायी फोटो

सोशल मीडियावर रोज अनेक फोटो , व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही फोटो पाहून आपले मनोरंजन होते तर काही फोटो पाहून आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा मिळतात.असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बांगड्या विकणाऱ्या आईचा लेक IAS झाला, पण झगमगाट अंगाला शिवला नाही, IAS रमेश घोलप यांचा प्रेरणादायी फोटो
ISA officer
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 8:33 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक फोटो , व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही फोटो पाहून आपले मनोरंजन होते तर काही फोटो पाहून आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा मिळतात.असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समाजात आयएएस अधिकाऱ्यांचा दर्जा वेगळा असतो, महाराष्ट्रामधील आयएएस अधिकाऱ्यांच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी तुम्हाला माहित असतील. असाच एक मातीशी नातं जूळवून ठेवणार आयएएस अधिकारी सध्या खूप चर्चेत आहे. बांगड्या विकणाऱ्या आईचा लेक IAS झाला, पण परिस्थीतीची जाण असणारा महाराष्ट्राच तडफदार आधिकारी IAS रमेश घोलप यांनी सोशल मीडियावर पुन्हा सर्वांचे मन जिंकले आहे

तुम्ही कधी एखाद्या आयएएस अधिकाऱ्याला रस्त्यावर बसून वयोवृद्ध व्यक्तीशी बोलताना तुम्ही कधी पाहिलं आहे का ? असाच एक फोटो स्वत : आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर होताच सोशल मीडियावर या फोटोबद्दल चर्चा होण्यास सुरुवात झाली. या फोटावर अनेक यूजर्स त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

काय आहे या फोटोमध्ये :

या फोटोमध्ये वृद्ध व्यक्तीसोबत दिसणारी व्यक्ती आयएएस अधिकारी आहे. आयएएस अधिकाऱ्याचा हा फोटो साधेपणा आणि संस्कृतीचे उत्तम उदाहरण देतो.आयएएस अधिकारी रमेश घोलप यांची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात ते एका वृद्ध व्यक्तीसोबत जमिनीवर बसले आहेत आणि बोलण्यात दंग झाले दिसत आहेत.

या फोटोमध्ये, आपण पाहू शकता की तो त्याच्या इनोव्हा कारमधून बाहेर येत आहे आणि एका वृद्ध व्यक्तीबरोबर जमिनीवर बसला आहे त्यांची विचारपूस करत आहेत. तर आयएएस अधिकाऱ्यासोबत असलेले अंगरक्षक कारच्या आत बसले आहेत सोशल मीडियावर शेअर केलेले हे चित्र आयएएस रमेश घोलप यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे, जे पाहून सोशल मीडिया यूजर्समध्ये त्यांची क्रेज वाढत चालली आहे.

फोटो शेअर करताना आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘अनुभव म्हणतो मातीची पकड मजबूत आहे, मी संगमरवर पाय घसरताना पाहिले आहेत.’ आतापर्यंत फोटोवर सुमारे 4 हजार लाईक्स आल्या आहेत. यूजर्स या फोटोवर भरभरून कमेंटस आणि शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

Video | तब्बल 13 फुटांचा अजस्र साप, उचलण्यासाठी घ्यावी लागली जेसीबीची मदत, व्हिडीओ व्हायरल

एनसीबीचे अधिकारी ‘मन्नत’वर धडकले, नेटकऱ्यांचा शाहरुखला पाठिंबा, #ShahRukhKhan, #Mannat ट्रेंडिंगवर

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.