हरणाला पकडता पकडता नाकीनऊ! वनविभाग पकडायला, हजारो लोक बघायला

आयएफएस अधिकारी गौरव शर्मा यांनी हा फोटो शेअर करत लिहिले की, वन विभागाच्या पथकाने कसेबसे त्याची सुटका करून जंगलात नेले.

हरणाला पकडता पकडता नाकीनऊ! वनविभाग पकडायला, हजारो लोक बघायला
Rescue videoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 5:44 PM

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. या व्हिडिओमध्ये जंगलातून नव्हे तर घरातील खोलीतून एक हरण पकडल्याचे दिसत आहे. तो एका घराच्या खोलीत शिरला आणि तिथेच उभा राहिला. हे हरण रस्ता विसरून तिथे पोहोचले होते. ही घटना मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथल्या विजयरावगडमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. इथल्या एका खोलीत अचानक हरण दिसल्याने लोक घाबरले. आयएफएस अधिकारी गौरव शर्मा यांनी हा फोटो शेअर करत लिहिले की, वन विभागाच्या पथकाने कसेबसे त्याची सुटका करून जंगलात नेले.

या व्हायरल फोटोमध्ये हे हरण घरातील खोलीत उभं राहून हैराण झालेलं दिसत आहे. समोरून कोणीतरी त्याचा फोटो काढला. मात्र, हरणाने खोलीत प्रवेश केल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तिथे पोहोचले आणि जाळीच्या साहाय्याने हरणाची तिथून सुटका करण्यात आली.

Deer rescued by forest team

Deer rescued by forest team

हे इतकं सोपं नसल्याचंही सांगण्यात आलं. त्याला पकडताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला. त्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये असेही दिसत आहे की, हजारो लोकांची गर्दी आहे आणि अनेक कर्मचारी त्याला पकडण्यात गुंतले आहेत. इतक्या सगळ्या प्रयत्नांनंतर या हरणावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

हा व्हिडिओ आणि त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर येताच चर्चा सुरू झाली की, आपण प्राण्यांच्या जमिनी इतक्या ताब्यात घेतल्या आहेत की, त्यांना राहण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. कदाचित त्यामुळेच ते आता जंगल सोडून शहरांकडे आणि गावांकडे पळून जात आहेत असं लोक म्हणतायत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.