Viral : हेल्मेटचं महत्त्व जाणून घ्या फक्त 6 सेकंदात! IPS अधिकाऱ्यानं शेअर केला Video
सोशल मीडिया(Social Media)वर अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ रस्ते अपघातांशी संबंधित आहेत. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट (Helmet) घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत.
रस्ते अपघाता(Road Accidents)च्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. यामुळेच लोकांना हेल्मेट (Helmet) घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. डोक्याला गंभीर दुखापत होण्यापासून संरक्षण करण्यासाठी हेल्मेटपेक्षा चांगलं संरक्षणात्मक कवच नाही. एका अहवालानुसार, हेल्मेटमुळे मृत्यूचं प्रमाण 42 टक्क्यांनी कमी होतं. सोशल मीडिया(Social Media)वर अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ रस्ते अपघातांशी संबंधित आहेत. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हेल्मेटचे महत्त्व समजेल.
हेल्मेटमुळे गंभीर अपघातातून बचावला
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक माणूस बाइक चालवत आहे आणि ‘कट’ मारण्याच्या नादात तो बाइकवरून डोक्यावर पडला. सुदैवानं त्यानं हेल्मेट घातलं होतं. मात्र तो ज्या मार्गानं पडला, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असती आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं असतं. परंतु हेल्मेटमुळे त्याच्यासोबत कोणताही गंभीर अपघात झाला नाही.
ट्विटर हँडलवर शेअर
अवघ्या 6 सेकंदांचा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून, ‘फक्त 6 सेकंदात हेल्मेटचं महत्त्व जाणून घ्या’, असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 49 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2800हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे.
#Helmet का महत्व सीखें सिर्फ 6 सेकेंड में. pic.twitter.com/wzuVjVGVvt
— Dipanshu Kabra (@ipskabra) January 14, 2022
हेल्मेटनं रोखला मृत्यू
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं, की ‘लगता है हेलमेट की गुणवत्ता का प्रचार कर रहे हैं.. या यूं कहें कि उसका दिन अच्छा रहा’, तर दुसऱ्या यूझरनं ‘हेल्मेटनं जागीच मृत्यू रोखला’, अशी टिप्पणी केली.