विसरा आता 9 ते 5 वेळेतील नोकरी; LinkedIn च्या सह संस्थापकाची अजून एक भविष्यवाणी, यापूर्वीचा एकही अंदाज नाही चुकला
Office Time : चाकरमान्यांसाठी मोठी बातमी आहे. कार्यालयीन वेळ हे अनेकांच्या आयुष्याचा भाग आहे. 9 ते 5 या कार्यालयीन वेळेत अनेकांचे आयुष्य निघून जाते. पण लिंक्डइनचे सह संस्थापक रीड होफमॅन यांनी ही वेळ लवकरच गुंडाळल्या जाईल असा अजब दावा केला आहे.
प्रत्येकाची एक वेळ असते, वेळ आल्यावर कळते, वेळ निघून गेल्यावर काही हाशील, वेळेत या, वेळ महत्वाचा असतो, अशा कितीतरी वाक्य प्रचार, म्हणी वेळेची महती सांगतात. चाकरमान्यांसाठी तर 9 ते 5 ही वेळ म्हणजे जणू त्यांची रोजीरोटीच असते. या काळात त्यांना कार्यालयात खपावे लागते. राब राब राबावे लागते. अर्थात सर्वच कर्मचारी वेळेचे बंधन पाळत नाही. पण या वेळेचा एक दबाव असतो. 9 ते 5 या कार्यालयीन वेळेत अनेकांचे आयुष्य निघून जाते. पण लिंक्डइनचे सह संस्थापक रीड होफमॅन यांनी ही वेळ लवकरच गुंडाळल्या जाईल असा अजब दावा केला आहे.
काय आहे दावा
लिंक्डइनचे सह संस्थापक रीड होफमॅन यांच्या मते AI आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत आहे. येत्या काही वर्षात, स्पष्ट सांगायचे तर 2034 पर्यंत 9 ते 5 या काळातील नोकऱ्या संपुष्टात येतील. कार्यालयीन कामाची वेळ अशी असणार नाही. त्यांचा याविषयीचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. त्यांना पारंपारिक नोकऱ्या आणि तिथली कार्य संस्कृती संपून जाण्याचे भाकीत केले आहे. कंपन्यांनी या तंत्रज्ञानाच्या जगतात नवीन विचार करायला हवा, त्यांनी पारंपारिक गोष्टीत आतापासूनच बदल करायला हवा, अशी वकिली होफमॅन यांनी केली आहे.
नारायण मूर्तींचे एकदम विरुद्ध विचार
कामाच्या तासाविषयी कर्मचाऱ्यांची भूमिका बदलेल असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे मोठी आयटी फर्म इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती आणि इतर उद्योजकांनी कर्नाटक सरकारला कामाचे 14 तास करण्यावर विचार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या दोन टोकाच्या कार्य संस्कृतीच्या कल्पनामध्ये आता मूर्ती खरे ठरणार की होफमॅन हे कळायला आपल्याला किमान दहा वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे.
Your 9-to-5 job is dying.
By 2034, it’ll be extinct.
That’s Reid Hoffman’s latest prediction – the founder of LinkedIn who predicted the rise of social media in 1997.
Here’s what he said next: pic.twitter.com/dZTDzBKlfB
— Neal Taparia (@nealtaparia) July 24, 2024
हे भाकीत ठरले होते खरे
नील तापरिया यांनी रीड होफमॅन यांची पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी यापूर्वी होफमॅन यांच्या तीन भविष्यवाण्यांचा उल्लेख केला आहे. यापूर्वीचे भाकीत खरं ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
1.त्यांनी 1997 मध्ये सोशल मीडिया हा जगावर राज्य करेल. समाजात समाज माध्यमांचे पर्व येईल ही भविष्यवाणी केली होती. त्याकाळी समाज माध्यमांचा नुकताच जन्म होत होता. तर फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम वा इतर सोशल मीडियाचा जन्म सुद्धा झाला नव्हता.
2.जगातील साधनांचा वापर करुन लोक नवीन अर्थव्यवस्था उभारतील. जे उत्पादन करणार नाहीत, ते व्यवसाय करतील ही त्यांची भविष्यवाणी पण खरी ठरली आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टपासून अनेक कंपन्या आपल्यासमोर आहेत. तर अनेक युनिकॉर्न आणि स्टार्टअप्स आपल्यासमोर आहेत.
3. तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स जगभरात मोठी क्रांती आणणार असल्याचे त्यांनी कित्येक वर्षे अगोदर सांगितले होते. त्यावेळी एआयचा उल्लेख सुद्धा जगात होत नव्हता.