माणसाला खरं तर एकदा सुद्धा सॉरी (Sorry) म्हणायला जड जातं. कधी विचार केलाय का कुणी एका पेक्षा जास्त वेळा सॉरी म्हणू शकतं. पण आपल्याला खात्री आहे कि तोच माणूस जर प्रेमात (Love) असेल तर एक काय हजार वेळा सॉरी म्हणू शकतो. या सॉरीसाठी तो हजार मार्ग अवलंबू शकतो. असे अनेक अतरंगी किस्से अनेकदा वायरल (Viral) झाले आणि लोकांनीही हा किस्सा प्रेमातच घडला असावा असा दरवेळी तर्क लावला. करणार काय इतका अतरंगीपणा माणूस फक्त आणि फक्त प्रेमात करू शकतो. असाच एक किस्सा घडलाय बंगळूरमध्ये. बंगळूरच्या एका प्रायव्हेट शाळेत, शाळेच्या आवारात सगळीकडे कुणीतरी,” सॉरी,सॉरी,सॉरी…” लिहून ठेवलंय. हा किस्सा ट्विटरवर अगदी दूर दूर पर्यंत पोहचलाय.
Karnataka | ‘Sorry’ painted all over the premises of a private school and on the streets surrounding it in Sunkadakatte
हे सुद्धा वाचाTwo bike-borne persons were seen in the CCTV footage. Efforts on to identify and trace them: Dr Sanjeev Patil, DCP West Bengaluru pic.twitter.com/mbrbznwu7x
— ANI (@ANI) May 25, 2022
रिपोर्ट्सनुसार, बंगळूरच्या एका शहरात शांतीधामा स्कूल नावाची एक शाळा आहे. ज्या शाळेबाहेर रस्त्यावर, भिंती आणि पायऱ्यांवर काही उपद्रवी लोकांनी मोठ्या लाल अक्षरात इतक्या वेळा ‘सॉरी’ लिहिलंय की पाहणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल. पश्चिम बंगळुरूचे डीसीपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दुचाकीस्वार दिसत आहेत, ज्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. असं का केलं गेलंय या मागचं कारण स्पष्ट नाही पण सीसीटीव्हीमध्ये दोन व्यक्ती नक्कीच दिसत आहेत. ते ‘डिलिव्हरी बॉईज’सारख्या फूड डिलिव्हरी बॅग घेऊन जाताना दिसतात, ज्यातून ते भिंतीवर रंग काढून सॉरी लिहिताना दिसतात.
nibba nibbi things
— ♠₦ (@haloform_zn) May 25, 2022
हे फोटोज इतके हास्यास्पद आणि त्याहूनही हास्यास्पद आहेत त्यावर येणाऱ्या कमेंट्स. लोकांनी चक्क “निब्बा-निब्बी, सच्चे इश्क का केस, गर्लफ्रेंड को लिख रहा होगा,टिनएजर्स लव्ह” असं म्हणत ही पोस्ट प्रचंड वायरल केलीये.
Sache Ishq ka case hai..
— Sumti Jain (@sumtijain26) May 25, 2022
इतक्या सगळ्या गोंधळात हे फोटोज मात्र सगळीकडे वायरल झाले आहेत आणि लोकं नुसते वायरल करून थांबले नाहीत पण त्यांनी यात एक मस्त प्रेमकथा शोधून काढलीये. बाकी काही असू, पण ही फक्त एक प्रेमकथाच असू शकते ही लोकांना खात्री आहे.