2 लाखांचं कर्ज आणि बदल्यात 40 वर्षाच्या सावकाराचं 11 वर्षाच्या मुलीशी लग्न, हा कसला न्याय?
एक अशी घटना घडली आहे जी वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण हजारो वर्षे मागे गेलो आहोत का? ही घटना गरिबीची खिल्ली उडवणारी घटना आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने 11 वर्षांच्या निष्पाप मुलाशी लग्न केले आहे. कारण ऐकून तर तुम्ही अजून थक्क व्हाल, तुम्हाला धक्का बसेल.
पाटणा: बिहारमध्ये एक अशी घटना घडली आहे जी वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण हजारो वर्षे मागे गेलो आहोत का? ही घटना गरिबीची खिल्ली उडवणारी घटना आहे. हे प्रकरण राज्यातील सिवानमधील मैरवा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. जिथे एका 40 वर्षीय व्यक्तीने 11 वर्षांच्या निष्पाप मुलाशी लग्न केले आहे. कारण ऐकून तर तुम्ही अजून थक्क व्हाल, तुम्हाला धक्का बसेल. या मुलीची आई दोन लाखांचे कर्ज फेडू शकली नाही म्हणून हा सगळा प्रकार घडलाय.
अल्पवयीन मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांना याप्रकरणी प्रश्न विचारले जात आहेत. तसेच तिच्याशी लग्न करणारी व्यक्तीही प्रश्नांची उत्तरे देत आहे. महेंद्र पांडे असे आरोपीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती मैरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीपूर गावची रहिवासी आहे. संपूर्ण गावात या लग्नाची चर्चा आहे.
लोकांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओच्या कमेंट सेक्शनकडे पाहून एका युजरने म्हटले आहे की, “स्थानिक प्रशासनाने या घटनेवर कठोर कारवाई केली पाहिजे.” एका चौथ्या युजरने लिहिले की, सरकार काय करत आहे?” एक अन्य यूजर ने लिहिलं, “ये क्या बकवास है?”
या ट्विटला उत्तर देताना बिहार पोलिसांनी सिवान पोलिसांना टॅग करत लिहिले आहे की, “सिवान पोलीस कृपया आवश्यक कायदेशीर कारवाई करा.”
याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छेनी चपर गावात राहणाऱ्या मुलीच्या आईला महेंद्र पांडे याने दोन लाख रुपयांचे कर्ज दिले होते. याबाबत तो वारंवार तक्रार करत होता, मात्र गरिबीमुळे मुलीचे आई-वडील पैसे परत करू शकले नाहीत. याचाच फायदा घेत पांडे याने अल्पवयीन मुलीशी लग्न केले. तो तिला स्वत:च्या घरातच ठेवतोय.
या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या आईचे म्हणणे आहे की, महेंद्र पांडे त्यांचा नातेवाईक आहे. त्याने आपल्या मुलीला लिहायला वाचायला शिकवेल असं सांगितलं होतं पण त्याने तिच्याशी लग्न केलं. तिला आपल्या मुलीला घरी आणायचे आहे. तर दुसरीकडे महेंद्र पांडे काहीही स्पष्टपणे बोलणे टाळत आहेत.
कधी अल्पवयीन मुलाशी लग्न करून चूक केली, जी शिक्षा मिळेल ती भोगणार असं तो म्हणतो. तर कधी म्हणतो मुलगी समजून तिला घेऊन आलोय, तिला जिथे हवं तिथे ती जाऊ शकते. कधी तो मुलीला आईला फोन करून धमकी द्यायला सांगतो की, मीडियाकडे गेलीस तर तुलाच अडकवू.
महेंद्र पांडे यांना आधीच दोन मुले असल्याचेही बोलले जात आहे. तो विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे की त्याने मर्जीने लग्न केले आहे. त्याचवेळी अल्पवयीन मुलीचे म्हणणे आहे की, तिच्या आईला महेंद्र पांडे यांनी कर्ज दिले होते, किती माहित नाही. तिची आई तिला आणून पांडेकडे सोडून गेली. तर मुलीची आई तिला शिकवायला घेऊन जाऊन तिच्याशी महेंद्र पांडेने लग्न केल्याचे सांगत आहे.