Horrible Tradition : कितीही त्रास झाला तरी पण बायको भेटू दे; लग्न जुळावे म्हणून तरुण सहन करतात मुंग्यांचा चावा

जगभरात अनेक अनोख्या जाती आहेत. त्यांची परंपरा, खाणे-पिणे, राहणीमान सगळे वेगळेच असते. या आदिवासी जनजमाती आजही शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा पाळताना दिसतात. अशीच विचित्र प्रथा ब्रझिलमध्ये(Brazil's Amazon Forest) पहायला मिळते. येथील ‘साटेरे-मावा’ या आदिवासी जमातीत लग्न जुळावे म्हणून तरुण मुंग्यांचा चावा सहन करतात(Ant-Test).

Horrible Tradition : कितीही त्रास झाला तरी पण बायको भेटू दे; लग्न जुळावे म्हणून तरुण सहन करतात मुंग्यांचा चावा
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 10:57 PM

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय. लग्न जुळवताना वधु-वरांचे वय, रंग, रुप, राहणीमान आदी गोष्टी पारखल्या जातात. मात्र, आदिवासी जमातींमध्ये अत्यंत भयंकर चाली रीतींचा आधार घेत लग्न जुळवली जातात. अशीच एक भयानक प्रथा ब्रझिलमध्ये पहायला मिळते.

जगभरात अनेक अनोख्या जाती आहेत. त्यांची परंपरा, खाणे-पिणे, राहणीमान सगळे वेगळेच असते. या आदिवासी जनजमाती आजही शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा पाळताना दिसतात. अशीच विचित्र प्रथा ब्रझिलमध्ये(Brazil’s Amazon Forest) पहायला मिळते. येथील ‘साटेरे-मावा’ या आदिवासी जमातीत लग्न जुळावे म्हणून तरुण मुंग्यांचा चावा सहन करतात(Ant-Test).

बहुतेक आदिवासी जमाती या जंगलात वास्तव्यास आहेत. ते जंगल त्यांच्याच मालकीचे असते. यामध्ये तेथील सरकारही हस्तक्षेप करत नाही. जगातील विविध भागात राहणाऱ्या आदिवासी जमातींच्या प्रथा आणि रुढी परंपरा या कधी कधी आश्‍चर्यचकित करणाऱ्या असतात. यापैकीच ब्राझीलमधील जनजातीचे लोक आजही एका अत्यंत धोकादायक परंपरेचे पालन करताना दिसतात. त्यांचा विचित्र प्रथा पाहून अंगावर काटा येईल.

ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन भागात राहणाऱ्या ‘साटेरे-मावा’ या आदिवासी जमातीत अत्यंत भयानक प्रथा आहे. लग्नास इच्छुक असलेल्या तरुणांना आपल्या समुदायासमोर आपली बहादुरी सिद्ध करावी लागते. बहादुरी सिद्ध केल्यानंतरच त्यांना तरुण झाल्याचे समजले जाते आणि त्यांच्या विवाहाची तयारी सुरू होते. बहादुरी सिद्ध करण्यासाठी तरुणांना एकदम डेंजर टास्क दिला जातो.

लग्नासाठी उच्छुक असलेल्या तरुणांना अत्यंत धोकादायक अशा शेकडो मुंग्यांचा एकाचवेळी चावा सहन करावा लागतो. तरुणांची बहादुरी सिद्ध करण्यासाठी जाहीर कार्यक्रमच आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला जमाती मधील सर्व लोक उपस्थित राहतात.

यावेळी सर्वप्रथम धोकादायक समजल्या जाणार्‍या ‘बुलेट’ मुंग्यांना एका बॉक्समध्ये भरले जाते. ज्यावेळी या मुंग्या चवताळतात, त्यावेळी लग्नास इच्छुक तरुणाला बॉक्समध्ये घालण्यास सांगितले जाते. त्यावेळी तरुणांना मुंग्यांनी केलेला कडकडून चावा सहन करावा लागतो. चाव्यामुळे हातही सुजतो. अनेक वेळ तरुणांना हात बॉक्समध्ये धरावा लागतो. हा चावा सहन करणाऱ्या तरुणांना संपूर्ण जमाती समोर विवाह करण्यास पात्र असल्याचे ठरवले जाते. यानंतर या तरुणासाठी नवरी मुलगी शोधली जाते.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.