Video: शेकडो कोटींच्या 15 गगनचुंबी इमारती 45 सेकंदात जमीनदोस्त, चीनचा हादरवणारा व्हिडीओ
सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर हेडलाईन बनत आहे. हा व्हिडीओ चीनच्या युनान प्रांतातील कनमिंग इथला असल्याचा दावा केला जातो आहे. जिथं या गगनचुंबी इमारती एकत्रितरित्या पाडल्या गेल्या
जर कोणतीही इमारत पाडायची असेल तर त्यासाठी मोठी व्यवस्था करावी लागते. कधीकधी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर करावा लागतो. इमारत कशी जरी पडली, तरी इमारत पडतानाची दृश्यं भयाणच असतात. आता कल्पना करा की, जर एकाच वेळी 15 इमारती कोसळल्या तर काय होईल. विचार करण्याआधीच आम्ही तुम्हाला व्हायरल होणारा एक व्हिडीओ दाखवतो आहे, ज्यात तब्बल 15 इमारती एकसोबत पडताना दिसत आहेत. ( In China, 15 skyscrapers collapsed in 45 seconds, video goes viral)
सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर हेडलाईन बनत आहे. हा व्हिडीओ चीनच्या युनान प्रांतातील कनमिंग इथला असल्याचा दावा केला जातो आहे. जिथं या गगनचुंबी इमारती एकत्रितरित्या पाडल्या गेल्या. झिन्हुआ न्यूजच्या मते, यासाठी 4.6 टन स्फोटकं 85,000 ब्लास्टिंग पॉईंटवर ठेवण्यात आली होती. ज्या इमारती उभ्या करण्यासाठी काही वर्ष, हजारो कामगार आणि शेकडो कोटी रुपये खर्च झाले असतील त्या इमारती पाडायला अवघ्या 45 सेकंदाचा अवधी लागला
A great example of the problems with central planning/full blown industrial policy: 15 skyscrapers in China that were part of the Liyang Star City Phase II Project were just demolished after sitting unfinished for eight years due to no market demand. https://t.co/qzjxLnHQ2k
— Jon Hartley (@Jon_Hartley_) September 14, 2021
इमारती पाडण्याआधी इथं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. रेस्क्यु डिपार्टमेंटने तबब्बल 2000 हून अधिक कर्मचाऱ्याच्या 6 रेस्क्यु टीम बोलावल्या होत्या. जेणेकरुन काही दुर्घटना होण्याआधीच ती टाळता येईल. यामध्ये साईट फायर रेस्क्यु टीम, कॉम्पेहिन्सिव्ह इंमर्जेंसी टीम, फ्लड कंट्रोल टीम, शहरी व्यवस्थापन टीम यासारख्या युनिटचा समावेश होता.
या 15 इमारती भोवतीची सर्व दुकाने सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती आणि जवळपास राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. आता तुम्ही विचार करत असाल या इमारती पाडल्या तरी कशासाठी? तर या इमारती बऱ्याच काळापासून निर्मनुष्य अवस्थेत होत्या, त्यांचा कुठलाच वापर होत नव्हता. इमारतींच्या तळघरात पाणी भरलं होतं, त्यामुळे इमारती पायापासून सडायला लागल्या होत्या. या सर्व इमारती लिआंग स्टार सिटी फेज 2 या प्रकल्पाचा भाग होत्या, मात्र लोकांनी इथं घरं घेतलीच नाही. या प्रकल्पाची अंदाजे किंमत तब्बल 1 अब्ज चीनी युआन सांगितली जाते.