Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पावसात भरधाव ऑडीची रिक्षाला धडक, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात कॅमेरात कैद

हैद्राबादच्या सायबराबाद परिसरात घडलेल्या या धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ सायबराबाद ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करत संबधित अपघाताची माहिती दिली आहे.

Video : पावसात भरधाव ऑडीची रिक्षाला धडक, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात कॅमेरात कैद
cyberabaad accident cctv
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 4:10 PM

हैद्राबाद : पावसाळ्यात अपघाताच्या बऱ्याच घटना घडत असतात त्यातील काही अत्यंत विचित्र आणि अंगावर काटा आणणाऱ्या असतात अशी एक घटना हैद्राबादच्या सायबराबाद परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल जवळच्या रस्त्यावर घडली. एका भरधाव वेगातील गाडीने ऑटोरिक्षाला मागून येऊन जोरदार धडक दिली. या धड़केत रिक्षाचे बरेच नुकसान झाले असून त्यातील प्रवासी मृत्यूमुखी पडला तर रिक्षाचालकही गंभीर जखमी झाला आहे. या संपूर्ण अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (In Hyderabads Cyberabad A Full Speed Audi hits Auto one dead and on injured Video of Accident went viral)

सायबराबाद परिसरातील इनॉर्बिट मॉल जवळच्या रस्त्यावर सोमवारी (27 जून) पहाटे रिमझीम पाऊस सुरू असताना एका भरधाव वेगातील ऑडी गाडीने पुढे चाललेल्या एका ऑटोरिक्षाला मागून येऊन जोरदार धडक देत उडवलं. त्यानंतर कार त्याच वेगात पुढे निघून गेली. पोलिसांच्या तपासादरम्यान संपूर्ण प्रकार समोर आला असून संबधित गाडीचा चालक हा दारुच्या नशेत होता. त्याचे नाव सुजित रेड्डी असे असून तो त्याचे वडील रघुनंदन रेड्डी आणि मित्र आशिष हे एका पार्टीवरुन परतत असताना ही घटना घडली. सुजित हा गाडी चालवत होता. दारुच्या नशेत असल्याने त्याचा गाडीवरच्या वेगावरील कंट्रोल सुटला होता त्यामुळे त्याने रस्त्यातील रिक्षाला ठोकले.

पोलिसांकडून त्वरीत अटक

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरीतच घटनास्थळी धाव घेत रिक्षा चालक आणि प्रवासी यांना रुग्णालयात नेते. दरम्यान प्रवाशाचा तोवर मृत्यू झाला होता. तर चालक गंभीर जखमी होता. त्यानंतर घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजद्वारपे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत ऑडी चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सुजित, त्याचे वडील आणि मित्र आशिष यांच्या विरोधात हीट अँड रनचा गुन्हा नोंदवत त्यांना त्वरीत अटक केली आहे. दरम्यान सायबराबाद ट्रॅफिक पोलिसांनी संबधित घटनेचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करत संबधित अपघाताची माहिती दिली आहे.

इतर बातम्या :

Video | काचेच्या बॉटलवर तरुणीकडून योगा करण्याचा प्रयत्न, मध्येच घडलेल्या घटनेमुळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | बायको जोमात नातेवाईक कोमात, नव्या नवरीचा गृहप्रवेश एकदा पाहाच !

Video | निळी साडी नेसून थरारक स्केटिंग, 46 वर्षीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल

(In Hyderabads Cyberabad A Full Speed Audi hits Auto one dead and on injured Video of Accident went viral)

'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका.
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा.
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?.
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल.
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?.
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.