‘दिल दे दिया है, किडनी भी देंगें तुझे सनम!’ पण किडनी घेऊन बयेचा दुसऱ्यासोबतच छैय्या छैय्या

प्रेमासाठी कोण काय करेल काहीच सांगता येत नाही. एका तरुणाने प्रेम मिळवण्यासाठी चक्क आपली एक किडनी गमावली. एवढे करून देखील त्याच्या हाती निराशा आली आहे, कारण तो ज्या मुलीवर प्रेम करत होता तीने दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न केले. याबाबत स्वत: या व्यक्तीने TikTok वर खुलासा केला आहे.

'दिल दे दिया है, किडनी भी देंगें तुझे सनम!' पण किडनी घेऊन बयेचा दुसऱ्यासोबतच छैय्या छैय्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 6:14 PM

प्रेमासाठी कोण काय करेल काहीच सांगता येत नाही. एका तरुणाने प्रेम मिळवण्यासाठी चक्क आपली एक किडनी गमावली. एवढे करून देखील त्याच्या हाती निराशा आली आहे, कारण तो ज्या मुलीवर प्रेम करत होता तीने दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न केले. याबाबत स्वत: या व्यक्तीने (TikTok) वर खुलासा केला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती आपण आपली किडनी मैत्रिणीच्या आईला दान ( Kidney donation) केल्याचा दावा करत आहे. मात्र त्यानंतर देखील आपल्या पदरी निराशाच आली असून, आपण ज्या मुलीवर प्रेम करत होतो, तीन दुसऱ्या मुलासोबत लग्न केल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीचे नाव उजील मार्टिनेझ आहे, जो बाजा कॅलिफोर्निया, मेक्सिको येथील एका शाळेत शिक्षक आहे. (Ujiel) चा एक  TikTok व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलत आहे.

मैत्रिणीने केली फसवणूक

उझील मार्टिनेझने सांगितले की, त्याचे आपल्या गलफ्रेंडवर खूप प्रेम होते, प्रेमापोटी त्याने आपली एक किडनी तिच्या आईला दान केली. हे सर्व त्याने प्रेम मिळवण्यासाठी केले. मात्र एवढे सगळे करून देखील आपल्या हाती निराशा आली, संबंधित मुलीने तिच्या आईच्या ऑपरेशन नंतर महिन्याभरातच आपल्याशी संबंध तोडले. व दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले. पेशाने शिक्षक असलेल्या उझीलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो सोफ्यावर अत्यंत दुःखी अवस्थेत बसलेला दिसत आहे. या व्हिडीओला टिकटॉकवर 16 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

युजरच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तब्बल 16 लाख लोकांनी हा व्हिडीयो पाहिला आहे. या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. अनेक जणांनी उझीलची समजूत काढली आहे. त्यांनी उझीलला सांगितले की, तू नाराज होऊ नकोस, तीने एक तिच्यावर खरा प्रेम करणारा माणूस गमवला आहे. दरम्यान त्यानंतर उझील मार्टिने आणखी एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की मला माझ्या एक्स गलफ्रेंडबद्दल कोणतीही तक्रार नाही, तिच्यासोबत असलेली माझी मैत्री कायम राहील.

संबंधित बातम्या

लग्नाची चर्चा तर होणारच ना भाऊ; कोरोना निर्बंधांमध्येही 450 लोक राहणार उपस्थित, जोडप्याने बनवला स्पेशल प्लॅन

चटणीशिवाय momo खाण्यास कुत्र्याचा नकार, व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणतात…

Corona crisis 2022: यावर्षी 2 कोटीपेक्षा जास्त लोक होणार बेरोजगार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.