Video | #MonkeyVsDog महायुद्ध खरंच झालं होतं का? शिकारीआधी हलाल करण्याचा प्रयत्न?
कीकडे माकडांनी २५० कुत्र्यांच्या पिल्लांचा खात्मा केल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरुन शेकडो मीम्सही (Meme) तयार झालेत. ट्वीटरवर Monkey vs Dog हा हॅशटॅगही (Hashtag) ट्रेन्ड होतो आहे. तर दुसरकडे इन्टाग्रामवरील एका वेरीफाईड प्रोफाईलवरुन कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळणाऱ्या, त्याच्यावर माया करणाऱ्या एका माकडाचा व्हिडीओ आता व्हायरल (Video Viral) होतोय.
#MonkeyvsDog ट्रेंड (Trend) काही कमी होत नाही आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या बीड (Beed) जिल्ह्यातील एका गावातील ही घटना संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय बनलेला असतानाच आता या घटनेच्या परस्परविरोधी व्हिडीओ (Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ देखील बीडमधील असल्याची कूजबूज सुरु आहे. एकीकडे माकडांनी २५० कुत्र्यांच्या पिल्लांचा खात्मा केल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरुन शेकडो मीम्सही (Meme) तयार झालेत. ट्वीटरवर Monkey vs Dog हा हॅशटॅगही (Hashtag) ट्रेन्ड होतो आहे. तर दुसरकडे इन्टाग्रामवरील एका वेरीफाईड प्रोफाईलवरुन कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळणाऱ्या, त्याच्यावर माया करणाऱ्या एका माकडाचा व्हिडीओ आता व्हायरल (Video Viral) होतोय.
कुणी शेअर केला व्हिडीओ?
viralbhayani नावाचं एक वेरीफाईड इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. या प्रोफाईलवर कुत्र्याच्या पिल्लाला एका माकडानं आपल्या मुलासारखं पकडलं. हे माकड कुत्र्याच्या पिल्लाला उचलून घेतं. छतावरतीच एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जातं आणि त्याला खाऊ घालतं, असं व्हिडीओमध्ये दिसतंय. हा व्हिडीओ छत्तीसगडमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण खरंच माकडानं कुत्र्याच्या पिल्लावर माया केली आहे का?, त्याला वाचवलंय का?, यावरुन कुतूहल व्यक्त करण्यात आलं आहे.
पाहा इन्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला व्हिडीओ –
View this post on Instagram
आतापर्यंत ५५ हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक (Like) केलं असून अडीचशेहून अधिक कमेन्ट (Comments) या व्हिडीओवर केल्या गेल्या आहेत.
नेमका विश्वास कशावर ठेवायचा?
एका आयएफएस अधिकाऱ्यानंही हाच व्हिडीओ शेअर करत याला महाराष्ट्रातील घटनेशी जोडत एक महत्त्वाची गोष्ट उपस्थित केली आहे. त्यांनी म्हटलंय की…
‘गेल्या चार दिवसांपासून छत्तीसगजमधील एक माकड कुत्र्याच्या पिल्लाला गोंजारतंय, त्याला खाऊ घातलंय, त्याच्यावर माया करतंय. आणि आपण विश्वास ठेवून चाललो आहोत की महाराष्ट्रातील बीडमध्ये माकडांनीच कुत्र्यांचा बदला घेत त्यांच्या २५० पिल्लांची हत्या केली!’
आयएफएस अधिकारी सुसांत नंदा (Susanta Nanda IFS) यांनी केलेल्या ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला १६ हजारेपक्षा जास्त जणांनी पाहिलं असून दीड हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. यात एकानं म्हटलंय की जनावरांचं मन हे माणसापेक्षा मोठं असतं! तर दुसऱ्यानं म्हटलंय की बकऱ्याला कापण्याआधी त्याची सेवा केली जाते! एकूणच बीडमधील घटनेची चर्चा थांबायचं नाव घेत नाही आहे. Monkey vs Dog युद्धाला लोकांनी चांगलच मनावर घेतलंय.
This monkey is lovingly living & feeding a Puppy in Chatisgarh for the last 4 days…
And we believed in the Maharashtra’s Beed monkey’s story, where in monkeys supposedly went on to kill 250 dogs as revenge. pic.twitter.com/T9Xir0QVdl
— Susanta Nanda IFS (@susantananda3) December 21, 2021
पाहा स्पेशल रिपोर्ट –
संबंधित बातम्या –
Video | थरारक! भाऊ पाचव्या मजल्यावर आगीत अडकला होता, बहिणीच्या धाडसामुळे थोडक्यात वाचला
Video | भर लग्नमंडपातच नवरीमुलीकडच्यांनी नवऱ्याला आधी धू-धू धुतलं, नंतर पोलीस स्टेशनमध्येही खेचलं!