Viral Photo: बिबट्याला राखी बांधून भाऊ बनवला! राजस्थानातील थ्रिलिंग रक्षाबंधन, फोटो व्हायरल
एक अतिशय आश्चर्यजनक फोटो व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक महिला बिबट्याला राखी बांधताना दिसत आहे. तुम्ही माणसांना राखी बांधताना आणि बांधून घेताना पाहिलं असेल, पण क्वचितच एखाद्या स्त्रीला एखाद्या प्राण्याला राखी बांधताना पाहिलं असेल.
रक्षाबंधन (Rakshabandhan) अर्थात राखी हा सण देशभरात साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे. भावंडांचं अतूट नातं जपणारा हा सण आहे, ज्याची भावंडं वर्षभर वाट पाहत असतात आणि हा सण आला की त्यांच्या आनंदाला जागाच उरत नाही. देशात अनेक ठिकाणी गुरुवारी राखीचा सण साजरा करण्यात आला, तर काही ठिकाणी आज म्हणजेच शुक्रवारी हा सण साजरा केला जात आहे. तसं पाहिलं तर बहिणी या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधतात, पण आजकाल सोशल मीडियावर (Social Media) एक अतिशय आश्चर्यजनक फोटो व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक महिला बिबट्याला राखी बांधताना दिसत आहे. तुम्ही माणसांना राखी बांधताना आणि बांधून घेताना पाहिलं असेल, पण क्वचितच एखाद्या स्त्रीला एखाद्या प्राण्याला राखी बांधताना पाहिलं असेल.
आणखी काही जण बिबट्याच्या मागे उभे
चित्रात आपण पाहू शकता की बिबट्या कसा जमिनीवर आरामात बसला आहे आणि एक स्त्री त्याला राखी बांधत आहे. त्याचबरोबर आणखी काही जण बिबट्याच्या मागे उभे असल्याचे दिसून येत आहे. हे एक अतिशय धोकादायक दृश्य आहे, कारण चित्ते हे भयानक वन्य प्राणी आहेत, जे कोणालाही आपली शिकार बनवतात. लहान जनावरे त्यांना पाहून पळून जातात आणि माणसांचीही अशीच अवस्था होते. बिबट्यांशी संबंधित विविध व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात, ज्यात ते कधी प्राण्यांवर हल्ला करताना तर कधी माणसांवर हल्ला करताना दिसतात. असे प्राणी टाळले पाहिजेत, कारण सिंह, वाघ यांच्यानंतर जर कोणता प्राणी सर्वात जास्त धोकादायक असेल तर तो बिबट्याच असतो.
एका आजारी बिबट्याला राखी
बरं, बिबट्याला राखी बांधतानाचा फोटो आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला असून हे दृश्य राजस्थानमधील असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी लिहीलंय की, “युगानुयुगे, भारतातील माणूस आणि प्राणी वन्य प्राण्यांशी बिनशर्त प्रेमाने जगत आहेत. राजस्थानमध्ये, वन विभागाच्या ताब्यात देण्यापूर्वी एका आजारी बिबट्याला राखी (प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक) बांधून एक स्त्री हे अनिर्बंध प्रेम या प्राण्याला दाखवते.”
For ages, man & animal in India have lived in harmony with unconditional love to the wild. In Rajasthan, a lady shows this unfettered love to our wild by tying a Rakhi(symbol of love & brotherhood ) to an ailing Leopard before handing over to Forest Department. (As received) pic.twitter.com/1jk6xi1q10
— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 12, 2022
लोकांनाही या फोटोची खूप आवड आहेच, पण त्याचबरोबर धोकादायक असंही वर्णन केलं जात आहे. एका युझरने लिहिले की, ‘मला अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत. शेवटी राखी म्हणजे काय हे प्राण्याला काय माहीत… ‘