रस्त्यात दोन गायींची झुंज चाललेली, तो समोरुन बाईकवरुन येत होता, तितक्यात…मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर अनेकदा आपण मोकळ्या सोडलेल्या गायी पाहतो. मालक नसल्याने या गायी वाटेल त्या दिशेला चालत सुटतात. रस्त्यावर मोकळ्या सोडलेल्या या गायींमुळे अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली.
रस्त्यावर काहीवेळा आपल्याला मोकळ्या सोडलेल्या गायी पहायला मिळतात. या गायींना असच सोडून दिलेलं असतं. त्यांच्यासोबत मालक नसतो. अशावेळी या गायी वाटेल त्या दिशेला चालत सुटतात. काहीवेळा रस्त्याच या गायींमध्ये झुंज सुरु होते. त्यामुळे तिथून जाणाऱ्या माणसाच्या मनात भिती निर्माण होते. वाहतुकीला खोळंबा होतो. रस्त्यावर मोकळ्या सोडलेल्या गायींमध्ये अशीच झुंज सुरु असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला आपले प्राण गमवावे लागले. रस्त्यावर दोन गायींची झुंज सुरु होती. त्यामुळे एक बाईकस्वार खाली पडला. त्याचवेळी मागून जाणाऱ्या सरकारी बसने त्याला चिरडलं. या दुर्देवी घटनेत बाईकस्वाराचा मृत्यू झाला. वन्नारपेट भागातील ही घटना आहे. माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नगर पालिका एक्शन मोडमध्ये आली आहे. तमिळनाडूच्या तिरुनेलवेलीमधील ही घटना आहे.
गायींना बांधून ठेवण्यासाठी पशु पालकांना इशारा देण्यात आला आहे. त्या शिवाय नगर पालिकेने भटकणाऱ्या पशुंना पकडण्यासाठी अभियान सुरु केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुनेलवेलीच्या वन्नारपेट भागात रविवारी संध्याकाळी दोन गायींची रस्त्यावर झुंज सुरु होती. त्याचवेळी कोर्टाचा कर्मचारी वेलायुधराज आपल्या बाइकवरुन तिथून चालला होता. गायींना धडकून तो बाईकवरुन खाली पडला. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या सरकारी बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला.
हे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल
वेलायुधराजचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होतय. आधी सुद्धा अनेक लोक अशा घटनेचे बळी ठरले आहेत. स्थानिक लोकांनी सांगितलं की, अनेकदा दूध काढल्यानंतर गायींना मोकळ सोडलं जातं. या बाबत नगरपालिकेकडे अनेकदा तक्रार देण्यात आली आहे. पण नगर पालिका कारवाई करत नाही.
काय कारवाई?
याची किंमत रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना चुकवावी लागते. आता सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगरपालिकेवर टीका सुरु आहे. नगर पालिकेने आता कारवाई केलीय. नगरपालिकेने पशु पालकांना निर्देश दिले आहेत. रस्त्यावर मोकळ्या फिरणाऱ्या पशुंना पकडण्यासाठी अभियान सुरु केलय. नगर पालिकेने 47 गायी पकडून शेल्टर होममध्ये ठेवलय. गाय मालकांकडून दंड वसूल करण्यात येतोय.