तिसरे अपत्य जन्माला आल्यास ‘या’ कंपनीकडून कर्मचाऱ्यांवर बक्षिसांची खैरात; सोबतच मिळणार वर्षभराची पगारी सुटी
चीन एकापेक्षा अधिक अपत्य धोरणाला प्रोहत्साहन देताना दिसत आहे. वाचून आश्चर्य वाटलेना पणे हे खरं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चीनने गेल्या अनेक वर्षांपासून एक अपत्य धोरण स्वीकारले होते. याचा परिणाम असा झाला की, आता चीनमधील तरुणांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे.
चीनची (China) सर्वात मोठी समस्या म्हणजे सातत्याने वाढत असलेली लोकसंख्या (Population) ही आहे. चीन हा देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर आहे. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी चीनने गेली अनेक वर्ष एक अपत्य धोरणाचा (one child policy) स्वीकार केला होता. जर एखाद्या दाम्पत्याला एकापेक्षा अधिक अपत्य झाल्यास संबंधित दाम्पत्याला सर्व सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत होते. तसेच असे दाम्पत्य सरकारी नोकरीसाठी देखील अपात्र समजण्यात येई. मात्र आता हाच चीन एक पेक्षा अधिक अपत्य धोरणाला प्रोहत्साहन देताना दिसत आहे. वाचून आश्चर्य वाटलेना पणे हे खरं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चीनने गेल्या अनेक वर्षांपासून एक अपत्य धोरण स्वीकारले होते. याचा परिणाम असा झाला की, आता चीनमधील तरुणांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली असून, वृद्धांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथील सरकार आता नागरिकांनी एकापेक्षा अधिक अपत्य जन्माला घालावेत यासाठी प्रोहत्साहन देत आहे.
दोन पेक्षा अधिक अपत्य जन्मला घातल्यास बक्षीस
चीनमधील एक कंपनीने तर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बंपर ऑफर दिली आहे. या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याने जर दोन पेक्षा अधिक अपत्य जन्मला घातले तर या कंपनीच्या वतीने संबंधित कर्मचाऱ्याला एक वर्षाची सुटी तसेच तब्बल साडेअकरा लाखांचे बक्षीस देण्यात येत आहे. Beijing Dabeinong Technology Group असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते. या कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना तिसरा मुलगा जन्माला घालण्यासाठी प्रोहत्साहीत करण्यात येत असून, जो कर्मचारी तिसरे अपत्य जन्माला घालेल त्याला कंपनीच्या वतीने जवळपास 90 हजार युआन म्हणजेच साडेअकरा लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सोबतच एक वर्षांची सुटी देखील दिली जाणार आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या अपत्यासाठी देखील प्रोहत्साहन
एतकेच नाही तर या कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या अपत्यासाठी देखील बोनस देण्यात येत आहे. पहिल्या अपत्याच्या वेळी 30 हजार युआन म्हणजेच 3.54 लाख रुपये तर दुसऱ्या अपत्याच्यावेळी 60 हजार युआन म्हणजे सात लाख रुपये संबंधित कर्मचाऱ्याला देण्यात येतात. तर तिसरे अपत्या जन्मल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तब्बल साडेअकरा लाख रुपये आणि एका वर्षांची पगारी सुटी देण्यात येते. तसेच चीनचे असे अनेक शहरे आहेत, ज्या शहरात आता नागरिकांना एकापेक्षा अधिक मुलं जन्मला घालण्यासाठी प्रोहत्साहीत केले जात असून, अशा नागरिकांना विविध लाभ देखील देण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या
थंडीनं कुडकुडत होती चिमुरडी, देवदूत बनून एकानं केली मदत; हृदयस्पर्शी Video Viral