Viral Video: एका सेकंदाने वाचला! लोकं म्हणाले,”यमराज लंच ब्रेकवर होता म्हणून हा वाचलाय…” व्हिडीओ व्हायरल!
बुधवारी रेडिटवर सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आले होते आणि त्यानंतर आतापर्यंत 50,000 हून अधिक अपव्होट्स आले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आणखी एक सामान्य दिवस".
Dangerous Video: नशीब चांगलं असेल तर मृत्यू सुद्धा जवळ येऊ शकत नाही. जर फक्त एक सेकंद उशीर झाला असता तर या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असता. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या तोंडून एकच गोष्ट येत आहे ती म्हणजे त्या व्यक्तीने मृत्यूलाही (Death) चकवा दिला. होय, एका मोठ्या अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीचा एक धक्कादायक व्हिडिओ (Accident Viral Video) समोर आला आहे. बुधवारी रेडिटवर सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) शेअर करण्यात आले होते आणि त्यानंतर आतापर्यंत 50,000 हून अधिक अपव्होट्स आले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आणखी एक सामान्य दिवस”. छोट्या क्लिपमध्ये असं दिसतं, की माणूस रस्त्यावरून दुकानाकडे येतो तेव्हा फूटपाथ तुटतो आणि तो निसटतो.
मृत्यूला स्पर्श करून परत
जर त्या माणसाने फक्त एक सेकंद उशीर केला असता, तर कदाचित त्याला आपला जीव गमवावा लागला असता. रस्त्यापासून एका दुकानावर बनवलेल्या फुटपाथवर चढला आणि मग पायऱ्या चढताच मागच्या बाजूला खड्डा झाला. खड्डा खूप खोल होता आणि त्या माणसाचा जीव वाचला. व्हिडिओत दिसत आहे की, हा माणूस निष्काळजीपणे एका दुकानाच्या दिशेने जात आहे. मात्र, काही क्षणानंतर तो काँक्रिटच्या पृष्ठभागावरून चालत असताना फुटपाथ अचानक खालच्या नाल्यात पडतो. त्याच्यासोबत एखादी मोठी दुर्घटना टळली, हेही त्या माणसाला कळून चुकतं. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या चेहऱ्याचे भाव पाहायला मिळतात. ही घटना कुठे घडली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
“जेव्हा यमराज लंच ब्रेकवर असतो”
व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यासाठी इंटरनेटवरील लोक फार तत्पर असतात, या व्हिडिओवर सुद्धा लोकांनी उत्सुकता दाखवलीये. लोकांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने लकी व्यक्ती लिहिली, तर दुसऱ्याने मस्करी केली की, ‘तू तोडलंस, आता तू त्यासाठी पैसे दे.’ आणखी एका युझरने कमेंट केली की, “मला हे पाहिल्यानंतरच खूप धक्का बसला आहे. जणू काही मृत्यू जवळून निघून गेला आहे.” आणखी एका युझरने लिहिले, “जेव्हा यमराज लंच ब्रेकवर असतो.”