Dog Viral Video: लिंबू तोंडात टाकल्या टाकल्या कुत्रं म्हणालं, “बाई बाई…काये हे!”, लोकांच्या पसंतीस पडलेला व्हिडीओ!

पूर्वी असं म्हटलं जायचं की कुत्रं फक्त घराच्या संरक्षणासाठी ठेवावं काही लोकांचा अजूनही तसा विश्वास आहे. पण आता गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत लोकांना कुत्रं अनेक कारणांसाठी आवडतं.

Dog Viral Video: लिंबू तोंडात टाकल्या टाकल्या कुत्रं म्हणालं, बाई बाई...काये हे!, लोकांच्या पसंतीस पडलेला व्हिडीओ!
Dog Viral Video Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 12:16 PM

कुत्रा (Dogs) हा अतिशय मजेशीर आणि मैत्रीपूर्ण प्राणी आहेत. म्हणूनच जगभरातील लोक या प्राण्याला पसंत करतात आणि पाळतात. असे मानले जाते की कुत्रा हा एकमेव प्राणी आहे जो जगात सर्वात जास्त पाळला जातो. खेड्यापाड्यात इतकं नाही, तर शहरांमध्ये तुम्हाला बहुतेक घरांमध्ये काही पाळीव कुत्रा दिसेल. पूर्वी असं म्हटलं जायचं की कुत्रं फक्त घराच्या संरक्षणासाठी ठेवावं काही लोकांचा अजूनही तसा विश्वास आहे. पण आता गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत लोकांना कुत्रं अनेक कारणांसाठी आवडतं. लोकांना कुत्र्यांवर प्रेम आहे (People Love Dogs) , त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, म्हणूनच ते त्यांना आपल्या घरात ठेवतात. अगदी बेडवर झोपतात आणि महागडं जेवणही खाऊ घालतात. आजकाल सोशल मीडियावर पाळीव कुत्र्याचा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Video Viral Of Dogs) होत आहे, जो पाहून तुम्ही खूप हसाल.

कुत्र्याला चवीला लिंबाचा तुकडा

खरंतर या व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या पाळीव कुत्र्याला चवीला लिंबाचा तुकडा देतो, पण कुत्र्याने तो तोंडात टाकताच तो लगेच ते लगेच बाहेर काढतो. तो लिंबाचा तुकडा मिळावा म्हणून आधी कुत्राच मालकाकडे हट्ट करतो आणि चव घेतल्या घेतल्या पटकन तोंडातून बाहेर काढतो आणि मजेशीर प्रतिक्रिया देतो. ती प्रतिक्रिया पाहूनच आपल्याला हसू येतं आणि हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा माणूस चाकूनं लिंबाचे छोटे छोटे तुकडे बनवत आहे. दरम्यान, त्याच्या मागे बसलेला कुत्रा त्याच्याकडे लिंबू मागतो आणि तो मिळताच लगेच तोंडात टाकतो, पण जेव्हा त्याला त्याची चव कळते तेव्हा तो ते तोंडातून बाहेर काढतो. त्याची प्रतिक्रिया इतकी भारी असते की जणू काही ते म्हणतंय,”बाई बाई काये हे”. त्यानंतर लगेचच तो आपला मोर्चा मालकाकडे वळवतो. त्या माणसाच्या डोक्यावर चढतो आणि त्याला खाली दाबू लागतो.

पाहा कुत्र्याचा हा मजेशीर व्हिडिओ

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @MorissaSchwartz नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 67 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 14 हजारांहून अधिक लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कुत्र्याचं वर्णन गोंडस असं केलं आहे, तर काही जण त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता असं म्हणत आहेत. त्याचबरोबर काही युझर्स व्हिडिओ पाहून हसत आहेत.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.