White Moose Viral Video: अरे भाय भाय, स्वॅग हाय का काय? व्हिडीओ व्हायरल, नेटकरी प्रेमात
मग तो बाहेर येऊन स्वत:च पडतो आणि पाण्याचे शिंतोडे उडवतो, जे अतिशय सुंदर दिसते. हे सगळं तो इतका चिलपणे करतो की आपल्यालाच बघून भारी वाटतं आणि सोबतच प्रश्नही पडतो हा कुठला प्राणी.

निसर्गाने (Nature) मानवाला निसर्गाच्या रूपात अनोख्या देणग्या दिल्या आहेत. खरं तर या निसर्गाची किंमत माणसालाच नाही. निसर्गाची किमया काही औरच, माणसाला कधी काय सरप्राइज मिळेल काय सांगता येत नाही. आता हा प्राणीच बघा. हा प्राणी, याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. वाढत्या शहरीकरणात वनप्राणी पाहणे ही मोठी दुर्मिळ बाब आहे. हेच कारण आहे की, जेव्हा प्राण्यांशी संबंधित एखादी व्यक्ती सोशल मीडियावर येते, तेव्हा ती अधिकाधिक व्हायरल (Viral) होते. आजकालही अशाच प्रकारचा प्राणी लोकांमध्ये चर्चेत आहे. जे तुम्ही यापूर्वी क्वचितच पाहिले असेल? व्हिडिओत एक दुर्मिळ पांढरा मूस (White Moose) पाण्यात जाऊन स्वतःला थंड करण्यासाठी अंघोळ करताना दिसत आहे. प्राणी आपल्या शरीराला आराम देण्यासाठी आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी ज्या प्रकारे प्रवेश करतो ते खरोखर मजेदार आहे. मग तो बाहेर येऊन स्वत:च पडतो आणि पाण्याचे शिंतोडे उडवतो, जे अतिशय सुंदर दिसते. हे सगळं तो इतका चिलपणे करतो की आपल्यालाच बघून भारी वाटतं आणि सोबतच प्रश्नही पडतो हा कुठला प्राणी.
पाहा पांढरा मूस
Extraordinary white moose was spotted taking a dip in a pool in Sweden’s Varmland County ( by Hans Nilsson ) pic.twitter.com/QJtL2u5u4H
— Gabriele Corno (@Gabriele_Corno) August 15, 2022
“मी या प्राण्याच्या प्रेमात पडलो”
27 सेकंदाचा हा व्हिडिओ @Gabriele_Corno नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. लोकांना जे खूप आवडलं, त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि कमेंट करून त्यांचा फीडबॅक दिला जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांना वेगाने पसंत पडत आहे. याच कारणामुळे अनेक युझर्सनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रियाही नोंदवली. एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, हे दृश्य खरोखरच विलक्षण आहे की मी या प्राण्याच्या प्रेमात पडलो. त्याचवेळी आणखी एका युझरने लिहिले की, प्राणीही अशा प्रकारे पाण्याचा आनंद घेऊ शकतात, हे मी पहिल्यांदा पाहिले..! विलक्षण!. याशिवाय इतरही अनेक युझर्सनी वेगवेगळ्या प्रकारे या व्हिडिओचं कौतुक केलं.