भारतीय सीईओने सांगितले पाकिस्तानमधील मैत्रिणीसोबतचे अनोखे नाते, नेटकरी म्हणाले मैत्रीमध्ये कोणताही धर्म किंवा राष्ट्रीयत्व येत नाही…
स्नेहा बिस्वास अगदी कमी वयामध्येच स्टेप्स अकादमीच्या सीईओ आहेत. स्नेहाने एका पाकिस्तानी मैत्रींसोबतची तिची स्टोरी शेअर केलीयं, विशेष म्हणजे या स्टोरीचे काैतुक नेटकरी करताना दिसत आहेत. स्नेहाने सांगितले की तिची मैत्रीण इस्लामाबाद पाकिस्तानची रहिवासी आहे.
मुंबई : भारत (India) आणि पाकिस्तानचे संबंध कधीच चांगले राहिलेले नाहीयंत. पाकिस्तान नेहमीच भारताविरोधातील कारवाईमध्ये सहभागी असतो. हेच कारण आहे की, भारतीयांचा पाकिस्तानवर कधीच विश्वास बसू शकला नाही. इतकेच नाही तर इतर देशातही भारत आणि पाकिस्तानचे नागरिक ऐकमेंकांकडे द्वेषाने पाहतात. पाकिस्तानचे (Pakistan) नाव जरी काढले तरीही आपल्या डोळ्यांसमोर पाकिस्तानने केलेल्या अतिरेकी कारवायांमध्ये आपले शहिद झालेले सैनिक येतात. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील दोन मैत्रींची एक स्टोरी (Story) नुकताच समोर आलीयं. जी लोकांची मने जिंकत आहे.
इथे वाचा स्नेहाने शेअर केलेली पोस्ट
स्नेहा बिस्वासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली
भारताच्या स्नेहा बिस्वासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीयं, जी आता तुफान व्हायरल होताना दिसते आहे. स्नेहाने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये पहिल्या दिवशी एका पाकिस्तानी मुलीला कशी भेटली आणि या भेटीमुळे शेजारील देशातील लोकांबद्दलचा तिचा दृष्टिकोन कसा बदलला. दोन्ही देशांचे लोक सारखेच आहेत आणि चांगले मित्रही असू शकतात, असे स्नेहाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्नेहाने सांगितली पाकिस्तानच्या मैत्रिणीची स्टोरी
स्नेहा बिस्वास अगदी कमी वयामध्येच स्टेप्स अकादमीच्या सीईओ आहेत. स्नेहाने एका पाकिस्तानी मैत्रींसोबतची तिची स्टोरी शेअर केलीयं, विशेष म्हणजे या स्टोरीचे काैतुक नेटकरी करताना दिसत आहेत. स्नेहाने सांगितले की तिची मैत्रीण इस्लामाबाद पाकिस्तानची रहिवासी आहे. पहिल्या यादोघींची भेट हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये झाली. स्नेहा म्हणते की या भेटीत एकमेकांना समजून घ्यायला आणि आवडायला त्यांना फक्त काही सेकंद लागले आणि पहिल्या सेमिस्टरच्या दोघी खूप चांगल्या मैत्रीने झाल्या.
स्नेहाच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस
स्नेहा सांगते की, एकत्र चहा पिण्यापासून ते बिर्याणी खाण्यापर्यंत तसेच सोबत केस स्टडीजची तयारीही आम्ही केलीयं. तिचे आई-वडील खूप सपोर्टिव्ह आहेत, ज्यांनी त्यांच्या मुलींना स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी दिली. या पोस्टसोबतच स्नेहाने एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आणि तिची पाकिस्तानी मैत्रीण दोघेही आपापल्या देशांचे झेंडे हातामध्ये घेऊन उभ्या आहेत. स्नेहाच्या लिंक्डइन पोस्टला जवळपास 42 हजार लोकांनी लाईक केले आहे. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, मैत्रीमध्ये कोणताही धर्म किंवा राष्ट्रीयत्व दिसत नाही. त्याचवेळी दुसरा युजर म्हणतो की, आम्ही एकमेकांमध्ये भिंत बांधली आहे आणि ती तोडायची आहे.