‘चंद्र ते मंगळ’ या मिशनचे प्रमुख भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय, नासाने सोपवली जबाबदारी

आणखी एका मोठ्या संस्थेच्या प्रमुखपदावर भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे. नासाच्या 'चंद्र ते मंगळ' कार्यक्रमाची धुरा अमित क्षत्रिय यांच्यावर सोपविली आहे.

'चंद्र ते मंगळ' या मिशनचे प्रमुख भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय, नासाने सोपवली जबाबदारी
Amit Kshatriya Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 8:17 PM

नवी दिल्ली :  भारतीय वंशाच्या व्यक्ती जगातील बहुतांश दिग्गज कंपन्याचे प्रमुख झाले असतानाच आता मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन सॉफ्टवेअर आणि रोबोटीक इंजिनिअर अमित क्षत्रिय यांना नासाने नव्या ‘चंद्र ते मंगळ’ या कार्यक्रमाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले आहे. चंद्रावरील मानवाच्या दीर्घकालीन रहिवासासह लाल ग्रह मंगळावर मानवाला पाठविण्याचे मनुष्य जातीचे स्वप्न पूर्ण करण्याचे अवघड शिवधनुष्य क्षत्रिय यांच्या खांद्यावर अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने सोपवले आहे.

नासाने ‘चंद्र ते मंगळ’ या आपल्या नव्या कार्यक्रमाची धूरा भारतीय वंशाच्या अमित क्षत्रिय यांच्या खांद्यावर सोपविली आहे. नव्या कार्यक्रमाचा उद्देश्य चंद्र आणि मंगळावरील मानवी मोहिमांना तडीस नेण्याचा असून त्याद्वारे संपूर्ण मानवेला त्याचा लाभ मिळवून देण्याचा आहे असे नासाने जारी केलेल्या पत्रकात नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी म्हटले आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन पुढे म्हणाले की, चंद्रावरील मानवी मोहीमेचा सुवर्ण काळ आता साजरा होत आहे, नवा कार्यक्रम चंद्रावर दीर्घकाळ मानवाला यशस्वीपणे कसे राहता येईल तसेच मंगळ ग्रहावर मानवी झेप घेण्यासाठी मदत करेल.

मानवी मोहिमांची तयारी

चंद्र आणि मंगळ ग्रहावरील मानवी मोहिमांची तयारी करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे याची जबाबदारी आता अमित क्षत्रिय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. क्षत्रिय यांनी एकीकृत अंतरिक्ष प्रक्षेपण प्रणाली ‘ओरियन’ आणि एक्प्लोरेशन ग्राऊंड सिस्टम प्रोग्रामचे संचलन आणि नेतृत्व केले आहे. सामान्य अन्वेषण प्रणाली विकासचे कार्यवाहक सहायक संचालक म्हणूनही क्षत्रिय यांनी काम केले आहे.

अंतराळ मिशनमध्ये करियर

अमित क्षत्रिय यांनी साल 2003 मध्ये अंतराळ मिशनमध्ये करियरची सुरूवात केली होती. साल 2014 पासून ते 2017 पर्यंत अंतरिक्ष केंद्र उडान संचालक पदावर ते होते. क्षत्रिय भारतातून अमेरिकत स्थायिक होणाऱ्या पहिल्या पिढीचे वारस आहेत. त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून गणित आणि विज्ञान विषयात ग्र्यजुएशन पूर्ण केले आहे. आणि त्यानंतर टेक्सास युनिव्हर्सिटीतून गणितात एमएची पदवी घेतली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.