टॉयलेटमध्ये पाणी नाही, थांबवून ठेवलंय! प्रवाशाने केलं ट्विट, रेल्वे यंत्रणा जागी, युजर्स करतायत एन्जॉय
आता लोक फोन करून तक्रार करत नाहीत. आपली समस्या थेट सोशल मीडियावर शेअर करतात. अशीच एक तक्रार सध्या चर्चेत आहे. प्रचंड व्हायरल झालीये.
आजही आपल्या देशातील लोकसंख्येचा एक मोठा भाग रेल्वेने प्रवास करतो. अशा तऱ्हेने जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर काही वेळा तुम्हाला काही समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी रेल्वे आपल्या सेवेत सुधारणा करण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध गोष्टी करत आहे. पण तरीही प्रवाशांना वेळोवेळी त्रास सहन करावा लागतो. पण बदलत्या काळानुसार माणसंही बदलली आहेत. आता लोक फोन करून तक्रार करत नाहीत. आपली समस्या थेट सोशल मीडियावर शेअर करतात. जिथे रेल्वे प्रशासन अतिशय सक्रीय असून त्यांना ती समस्या लवकरात लवकर सोडवावी लागणार आहे. पण अनेकदा प्रॉब्लेम असा असतो की तो शेअर होताच तो व्हायरल होतो. अशीच एक तक्रार सध्या चर्चेत आहे. प्रचंड व्हायरल झालीये.
जेव्हा ट्विटर युजर अरुण (@ArunAru77446229) ने आपली समस्या सांगितली आणि ट्विट केले की, “मी पद्मावत एक्सप्रेस (14207) मधून प्रवास करत आहे आणि जेव्हा मी टॉयलेटमध्ये गेलो तेव्हा मला समजले की तिथे पाणी नाही. मी परत येऊन माझ्या सीटवर बसून स्वतःला थांबवून ठेवलंय. त्यात आधीच रेल्वे २ तास उशिरा आहे.”
आज मई पद्मावती एक्सप्रेस में सफर कर रहा था 14207 jaye to गाजियाबाद ट्रेन में टॉयलेट गया हापुड़ जा, पर तो यहां पानी नहीं आ रहा था अब मई क्या करू वापस आया और सीट पर रोक कर बैठा हूं ट्रेन 2 घंटे लेट चल रही हैं pic.twitter.com/QT5DAuFTBJ
— Arun Arun (@ArunAru77446229) March 11, 2023
ही तक्रार समोर येताच रेल्वे प्रशासनही सक्रीय झाले आणि त्यांनी ट्विट केले, ‘गैरसोयीबद्दल क्षमस्व. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया डीएमच्या माध्यमातून प्रवासाचा तपशील (पीएनआर / यूटीएस नंबर) आणि मोबाइल नंबर आमच्याशी सामायिक करा.”
असुविधा के लिए खेद है। हम आपसे अनुरोध करते हैं कि कृपया यात्रा विवरण (पीएनआर/यूटीएस नंबर) और मोबाइल नंबर वैकल्पिक रूप से DM के माध्यम से हमारे साथ साझा करें। आप अपनी शिकायत सीधे https://t.co/AmJ5X4xFpA पर भी शीघ्र निवारण के लिए रजिस्टर कर सकते हैं।
— RailwaySeva (@RailwaySeva) March 11, 2023
आता ट्विटर युजर अरुण सेल्फ मेड सेलिब्रिटी बनला आहे. अरुणला ट्विटरवर १९ जण फॉलो करत असले तरी त्याची समस्या लाखो लोकांनी पाहिली असून त्यावर कमेंट्स दिल्या जात आहेत.
बड़ा संकट का समय है अरुण जी के लिए, मैं उनके धैर्य की दाद देती हूँ!
?
— अमृता त्रिपाठी AmritaTripathi امرتا ترپاٹھی (@SamajseviAmrita) March 11, 2023
“Save water” campaign mein participate karne ke liye dhanywaad.
— India Wing (@india_wing) March 11, 2023
ऐसी परेशानी में भी हंस रहे हैं। क्या बात है मानना पड़ेगा आपकी इच्छाशक्ति को
— SJ (@I_Miscellaneous) March 11, 2023