तुम्हाला माहितेय रेल्वेत टॉयलेटची सुविधा कशी आली? त्यामागे आहे एक मजेदार पत्रं
त्यांनी आपले म्हणणे एका पत्राद्वारे इंग्रजांपर्यंत पोहोचवले. ज्यामध्ये टॉयलेटला गेल्यामुळे ट्रेन कशी पकडता आली नाही हे त्याने सांगितलं.
रेल्वे प्रवास सोयीचा मानला जातो. शौचालय हे यामागील सर्वात मोठे कारण आहे. कल्पना करा ट्रेनमध्ये टॉयलेट नसेल तर तुम्ही त्यात प्रवास करू शकाल का? बहुतेक लोक म्हणतील – नाही, शौचालयांशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करणे अशक्य आहे, परंतु एक काळ असा होता की भारतीय रेल्वेने अशी कोणतीही सुविधा दिली नव्हती. त्यानंतर एकदा ओखिल चंद्र सेन नावाच्या प्रवाशाने याबाबत तक्रार करून विनंती केली. त्यानंतर रेल्वेनं या बाबतीत विचार करायला सुरुवात केली आणि मग ट्रेनमध्ये टॉयलेटची सुविधा आली.
1853 मध्ये ही रेल्वे भारतात सुरू करण्यात आली. 6 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे अशी पहिली प्रवासी गाडी चालवली गेली त्यावेळी या गाडीला फार खास सुविधा नव्हत्या.
ओखिल चंद्रा यांनी जुलै 1909 मध्ये पश्चिम बंगालच्या साहिबगंज रेल्वे विभागाला एक पत्र लिहून ट्रेनमध्ये शौचालये बसविण्याची विनंती केली. त्यानंतर भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये टॉयलेट बसवण्याचं काम केलं.
हे पत्र ओखिल चंद्र सेन नावाच्या प्रवाशाने लिहिले होते. त्यांनी आपले म्हणणे एका पत्राद्वारे इंग्रजांपर्यंत पोहोचवले. ज्यामध्ये टॉयलेटला गेल्यामुळे ट्रेन कशी पकडता आली नाही हे त्याने सांगितलं. या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की, भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये टॉयलेट बसवावेत.
ओखिल चंद्र सेन यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून म्हटले आहे की, प्रिय सर, मी अहमदाबादपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वेने आलो आणि याच दरम्यान माझ्या पोटात दुखू लागले आणि त्यामुळे माझे पोट सुजले. मी टॉयलेटला बसलो, पण त्याचवेळी ट्रेनच्या गार्डने शिट्टी वाजवली आणि ट्रेन सुरू झाली. ट्रेन पकडण्याच्या वेळी मी एका हातात लोटा आणि दुसऱ्या हातात धोतर धरून धावत होतो.
यामुळे मी प्लॅटफॉर्मवर पडलो आणि माझे धोतरही तिथेच उघडले. तिथे स्त्री-पुरुष होते, त्या सर्वांसमोर मला लाज वाटली आणि मी ट्रेन चुकलो. ट्रेन चुकल्यामुळे मी अहमदपूर रेल्वे स्टेशनवरच थांबलो.
हे किती चुकीचं आहे की कुणीतरी टॉयलेटमध्ये गेलंय आणि त्याच्यासाठी रेल्वेचा गार्ड थांबला नाही. मी तुम्हाला विनंती करतो की, त्या ट्रेनच्या गार्डला दंड आकारा अन्यथा मी हे वर्तमानपत्रात छापून आणीन. तुमचा सेवक, ओखिल चंद्र सेन.