Video | गटाराच्या आत लपले दोन भलेमोठे अजगर! अखेर गटार उखडून पाहा अजगराला कसं गोणित भरलं?

Indian Rock Python : इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला अजगराचा व्हिडीओ हा महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये बोलणारी लोकंही मराठीतच संवाद साधत असल्याचं दिसून आलं आहे.

Video | गटाराच्या आत लपले दोन भलेमोठे अजगर! अखेर गटार उखडून पाहा अजगराला कसं गोणित भरलं?
गटार उखडून अजगराला धरलं!
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 4:15 PM

अजगर पाहून कुणालाही धडकी भरेल. अजगरला (Indian Rock Python) जनावरंही घाबरतात. जंगलात सामान्यपणे आढळणारे अजगर चक्क गटारातही आढळून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. भलामोठ्या अजगाराचं गटाराच्या आत दबा धरुन बसलेलं रुप आढळून आलं आहे. हे पाहून अनेकांना धक्का बसलाय. गटाराच्या आत लपून बसलेल्या अजगराला सर्पमित्रांनी एका गोणत्यामध्ये पकडलं. एक नव्हे तर एकाचवेळी गटारामध्ये चक्क दोन भेलमोठे अजगर आढळून आले आहेत. या अगरजाचा व्हिडीओ (Viral Video) हा धडकी भरवणारा असा आहे. दोघांनी गटाराची वरची लादी आधी काढून अजगराला गोणत्यात भरलंय. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनाही चांगला घाम फुटला होता. सर्पमित्रांच्या तावडीत सापडू नये म्हणून अजगरानंही पळण्याचा प्रयत्न केला खरा. पण या सर्पमित्रांनी शर्थीचे प्रयत्न करत आपलं कौशल्य पणाला लावलं आणि अखेर दोन्ही अजगर पकडण्यात यश आलं.

थरारक रेस्क्यू

हा व्हिडीओ इन्स्ट्राग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. या एकाच व्हिडीओमध्ये चक्क दोन अजगर पकडण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. यातील दोन्हीही अजगर हे प्रचंड मोठे होते. एक अजगर तर गटारातून वाट काढत निघाला होता. पण सर्पमित्रांच्या प्रसंगावधानतेमुळे त्याला पकडण्यात यश आलं आहे. तर दुसरीकडे अजगर दुसऱ्या एका गटाराखाली दबा धरुन बसला होता. त्यालाही पकडण्यात यश आलं आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला अजगराचा व्हिडीओ हा महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये बोलणारी लोकंही मराठीतच संवाद साधत असल्याचं दिसून आलं आहे. अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये अजगराला पकडण्याचा थरार एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी अजगराचा रस्ता क्रॉस करतानाचा एका व्हिडीओ केरळमधून समोर आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील एका भागात एकाचवेळी दोन अजगर पकडण्यात आले असल्याचं दिसून आलंय.

पाहा थरारक व्हिडीओ –

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एक अजगर रस्ता क्रॉस करताना हायवेवर दिसला होता. केरळमधील हा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र यावेळी एका स्विगिवाल्यानं अजगराच्या चक्क समोरून जात त्याची वाट ओलांडली होती. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प करणाऱ्या या अजगरापेक्षाही अजगराच्या तोंडासमोरुन धूम स्टाईल बाईक पळवणारा स्विगीचा डिलिव्हरी बॉय हा चांगलाच चर्चेत आला होता.

संबंधित बातम्या :

प्रियंका चोप्रा झाली आई! ‘या’ अब्जाधीशाच्या पत्नीनं सरोगसीद्वारे 22 मुलांना दिला जन्म

45 Years Of Khoon Pasina : मांडीवर वाघ अन् मनात आठवणींचा खजिना, अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 45 वर्ष जुना फोटो

धोका पत्करत कसं काढलं शेळीच्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर? Video Viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.